Jalgaon : जळगावच्या एरंडोल शहरातील पुरातन वास्तू पांडव वाडा की मशीद? दोन्ही गटाचं म्हणणं काय?
Jalgaon News : एरंडोल शहरातील पुरातन वास्तूचा तिढा सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे (Jalgaon) सुनावणी आहे.
Jalgoan News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल शहरातील पुरातन वास्तू ही पांडव वाडा (Pandav Wada) की मज्जिद असा प्रश्न उपस्थित झाल्याने, हा तिढा सोडवण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे (Jalgaon Collector) सुनावणी आहे. हा विषय राज्यभरात चर्चेला आला आहे. या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय? हे जाणून घेण्यासाठी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (Earandol) शहरातील पुरातन वास्तू ही पांडव वाडा की मशीद (Mosque) या विषयाने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या संदर्भात पांडव वाडा समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे याची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली असून यासंदर्भात आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून आज महत्त्वपूर्ण सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. तत्पूर्वी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून या वास्तूवर दावा ठोकण्यात आला आहे. या दोघांनी आपली भूमिका मांडली आहे.
त्यानुसार पांडव वाडा संघर्ष समितीचे प्रसाद दंडवते (Prasad Dandwate) म्हणाले की, हा पांडव कालीन पांडव वाडा आहे." "पांडव वाडा म्हणूनच ही पुरातन वास्तू आहे. 1995 मध्ये ही पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अज्ञातवासात असताना एका ब्राह्मणाकडे याठिकाणी पांडवांनी आश्रय घेतला होता. याठिकाणी भीमाने बकासुरचा वध केला, अशी आख्यायिका या वास्तू बद्दल सांगितली जाते. त्यामुळे ही वास्तू पांडवकालीन आहे. पांडवकालीन वास्तूवर जुमा मशीद ट्रस्ट स्थापन करुन याठिकाणी मुस्लीम धर्मियांनी या वास्तूवर कब्जा केला आहे. प्रत्यक्षात ही वास्तू सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यातील आहे आणि सीटी सर्व्हे उताऱ्यावर तसेच प्रपत्रावर याची नोंद पांडव वाडा अशी आहे," असं त्यांनी म्हटलं.
"याठिकाणी पांडवकालीन समया, कमळाचे फुलाचे चिन्ह, आयुर्वेदिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या काही वेली, एक अष्टकोन विहीर या ठिकाणी आहे. हे आजही असून त्यामुळे या सर्व गोष्टी पांडवकालीन असल्याची साक्ष देत आहेत. या पुरातन वास्तूंच्या ठिकाणी बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि या वास्तूवर कब्जा घेतला आहे. वेगळ्या जागेवर ट्रस्ट स्थापन करुन, कब्जा मात्र या वास्तूवर केला. तसेच या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी मदरसे सुरु करण्यात आलेले ते सुद्धा बेकायदेशीररित्या आहेत. तो बंद करण्यात यावा. ही सरकारची वस्तू आहे, अतिक्रमण काढावे, मदरसे बंद करावे, ही वास्तू सरकार जमा करावी," अशी मागणी प्रसाद दंडवते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही वास्तू पांडव वाडा असल्याबाबतची सर्व कागदपत्र प्रशासनाकडे देण्यात आली असून सुनावणी होऊन याठिकाणी आता प्रशासनाने ताबा घेतला आहे. सरकारची वास्तू असल्याने ती सरकारने ताब्यात घ्यावी, तिचे संवर्धन करुन ती सर्वांसाठी खुली करावी, अशीही त्यांची मागणी आहे, त्याबाबत उच्च न्यायालयात सुद्धा याचिका दाखल केली आहे.
जुमा मशीद असल्याची नोंद
तर पांडव वाडा म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेली वास्तू आता जूमा मशीद असल्याचा दावा दुसऱ्या गटाने केला आहे. या विषयावर जुमा मशीद ट्रस्टचे सदस्य सलीम पिंजारी म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी दोन्ही वेळच्या नमाज अदा केल्या जात आहेत, आणि आजही होत आहे. या ठिकाणचा आतला नकाशा बघितला तर आणि काही भिंतीवर पुरातन काळापासून आयाती लिहिण्यात आल्याचं दिसून येते. त्यामुळे ही मशिदच आहे." "पुरातत्व विभागाने 2023 मध्ये अहवाल जाहीर केला असून याठिकाणी कुठलंच अतिक्रमण नाही, तसेच नमाज पठण करण्यास काही एक हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ही मशीद बेकायदेशीर असल्याची तक्रार आहे, मात्र त्याचा आमच्याकडे उतारा असून त्यावर ही जुमा मशीद असल्याची नोंद आहे. तसा 2023 हा आताचा आणि 1922 च नकाशा आहे. यावरून ही मशीद असल्याचे सिद्ध आहे," असंही ते म्हणाले.
न्यायालयाचा निर्णय मान्य असेल
हा पांडव वाडा आहे, अशी कुठलीही गोष्ट याठिकाणी नाही, या परिसरात काही वर्षापूर्वी पांडे लोक राहत होते, त्यांचा पांडे नावाने वाडा होता, आणि त्यावरुन याचं नाव पांडव वाडा पडलं. त्यामुळे हा पांडव वाडा आहे, याला कुठलाही आधार नाही. याठिकाणी स्थापन करण्यात आलेली ट्रस्ट सुद्धा कायदेशीर आहे आणि हीच ट्रस्ट या जुमा मशिदीची मालक आहे. सव्वा दोनशे वर्षांपूर्वी या जमिनीचे मोजमाप केलं आहे, त्यानुसार नकाशा बनला आहे. त्यानुसार ही वास्तू जुमा मशीदच आहे. सर्व पुरावे आणि दस्तऐवज जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आता ठिकाणी केवळ दोनच जणांना नमाज करण्याची परवानगी आहे. मात्र ती रद्द करुन पूर्ववत सर्वांना नमाज पठाण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आहे. कुठलाही विरोध नाही कागदपत्रांची लढाई आहे, ती सुरु राहिल, न्यायालयाचा निर्णय मान्य असेल. न्याय न मिळाल्यास अजून वरच्या कोर्टात दाद मागू, असेही ते म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Babri Masjid Demolition : बाबरी मशीद पाडण्यात कोण आघाडीवर होतं? तेव्हा नेमकं काय झालं?