Ambadas Danve : शाई फेकणे हे चुकीचं, कशामुळे झालं हे तपासणे महत्वाचं : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Ambadas Danve : शाही फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे.
Ambadas Danve : एखाद्या मदतीला भीक म्हणत असो तर तेही चुकीचे पण शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नाशिकमध्ये (Nashik) खासगी कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) हे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाई फेकण्यात आली. यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. यावर ते म्हणाले कि, एखाद्या मदतीला भीक म्हणत असो तर तेही चुकीचे पण शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे, परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे, त्या दरम्यान चित्रीकरण झाले, त्या पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्राने सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता आहे. कारण त्याचा दोष नसताना त्या पत्रकारावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. अनेक कलम टाकलेले आहेत, पत्रकाराचा दोष नसताना त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे. पत्रकारांचा या विषयाशी काय संबंध नसतांना असे घडले आहे. याही विषयाकडे मीडियाने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
राज्यासह देशभरातील यंत्रणा केंद्रीय यंत्रणा केंद्राच्या राज्याच्या भारतीय जनता पार्टीच्या बटीक असल्यासारखे वागत आहेत. हे संजय राऊत साहेबांच्या जामीनातून स्पष्ट झालं आणि आता देशमुख चाही जामीनातून ते स्पष्ट होईल, सत्तेचा किती गैरवापर करायचा याचं हे उदाहरण असल्याचे दानवे म्हणाले. कशा पद्धतीनं माणसांना त्रास द्यायचा आणि अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करायचा याचाही उदाहरण आहे. तेही चुकीचे असून शाई फेकणे हे सुद्धा चुकीचे आहे. परंतु हे कशामुळे झालं याचा सुद्धा तपास करणं महत्वाचे असल्याचे दानवे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अविरतपणे काम करते आहे. जनता शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे आहे. सुनावणी काही जरी झाली तरी शिवसेना अबाधित राहणार आहे. जनतेच बळ त्यांच्या मागे आहे, जर ही सुनावणी निवडणूक आयोग सोडून न्यायालयात झाली तर शिवसेनेला नक्कीच न्याय मिळेल. निवडणूक आयोग बाहेर पद्धतीने काम करते की काय हे जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे. ज्या शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांनी नरेंद्र मोदींना सत्तेवर जाऊ नये, म्हणून त्यावेळेस नेतृत्व असलेल्या अटलजी, आडवाणी यांना आवाहन केलं होतं. मात्र सद्यस्थितीत ते नेतृत्व शिवसेना, शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांच्या पाठीवर हात फिरवत असेल तर येणाऱ्या काळात ज्यांनी गद्दारी केली तो आणि जो गद्दारी करण्याच्या पाठीवर हात फिरवत होते, निश्चित जनता यांना योग्य तो न्याय देईल, असे अंबादास दानवे म्हणाले.