Nashik News : आजच ड्युटीवर रुजू होणार होते, मात्र तत्पूर्वीच...नाशिकच्या जवानाचं दुर्दैवी निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Nashik News : वयाच्या 24 वर्षी जवान श्रीराम राजेंद्र गुजर यांच्या निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
![Nashik News : आजच ड्युटीवर रुजू होणार होते, मात्र तत्पूर्वीच...नाशिकच्या जवानाचं दुर्दैवी निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर maharashtra news nashik news Accidental death of Army Jawan shreeram gujar from Niphad at age of 24 Nashik News : आजच ड्युटीवर रुजू होणार होते, मात्र तत्पूर्वीच...नाशिकच्या जवानाचं दुर्दैवी निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/18/552df4d1a4fa12e70f05951d7467dba31689664599076738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) जवानांचे सातत्याने अपघाताच्या माध्यमातून निधन (Death) होण्याच्या घटना घडत आहे. निफाड (Niphad) तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी असलेला भारतीय सैन्य दलातील जवान सुट्टीवर गावी आले असता अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. वयाच्या 24 वर्षी श्रीराम राजेंद्र गुजर यांच्या निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
श्रीराम गुजर (Shreeram Gujar) हे काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. ते शिर्डी (Shirdi Saiababa) येथून साईबाबाचे देवदर्शन करुन अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी पल्सर गाडीचा अपघात झाला. ही घटना 16 जुलैला दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय (Sinnar Shirdi Highway) महामार्गावर सिन्नरजवळ पाथरेगावानजीक घडली. श्रीराम यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्रीराम यांच्यावर धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
श्रीराम हे आसाम (गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात शिपाई जहा ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. पंचवीस दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेले श्रीराम राजेंद्र गुजर शिर्डी इथून देवदर्शन करुन नातेवाईकांकडून घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या पल्सर मोटरसायकलला समोरुन येणाऱ्या प्लॅटिना मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) प्लॅटिनावरील दुचाकीस्वार आणि श्रीराम गंभीर जखमी झाले. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पाथरेचे ग्रामस्थ आणि पिंपरवाडी टोल नाका मदत पथकाने श्रीराम तसंच अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादम्यान रुग्णालयात श्रीराम यांची प्राणज्योत मालवली.
आज पुन्हा रुजू होणार होते....
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीराम यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंतचे शिक्षण रुई येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. नंतर बारावीचे शिक्षण विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण करुन सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला. श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर 236 IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या श्रीराम नातेवाईकांना भेटून मंगळवार 18 जुलै रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते, परंतु दुर्दैवाने तत्पूर्वीच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आजोबा संतु, आई अनिता, शेतकरी वडील राजेंद्र, भाऊ नितिन, बहीण प्रियंका असा परिवार आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या :
Nashik News : नाशिकच्या जवानाचे कर्तव्यावर असताना निधन, दिंडोरी तालुक्यावर शोककळा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)