Nashik Wine Yards : थर्टी फस्टसाठी वाईनप्रेमींची गर्दी, नाशिकमधील 'या' सहा वाईनयार्ड्सला भेट द्यायलाच हवी!
Nashik Wine Yards : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि वाईनचा आस्वाद घेण्यासाठी नाशिक हे परफेक्ट डेस्टीनेशन आहे.
Nashik Wine Yards : वाईन कॅपिटल (Wine Capital) म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये (Nashik) नववर्षाच्या स्वागतासाठी वाइनरी सज्ज झालेले आहेत कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष विदेशी वाईन प्रेमी नाशिकमध्ये दाखल होऊ शकत नव्हते. मात्र यंदा नाशिकमध्ये येऊन वाईनचा आस्वाद घेतला जात आहे.
वाईन कॅपिटल म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये नववर्षाचे स्वागत (New Year Celebration) हे जल्लोषात होणार आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यातून वाईन प्रेमी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. तसेच नाशिकमध्ये अनेक पर्यटन स्थळ असल्याने या पर्यटनस्थळावरही सकाळपासूनच गर्दी बघायला मिळते. त्यासोबतच रिसॉर्ट्स, वाइनरीज या ठिकाणच्या बुकिंग फुल झाल्या आहेत. दरम्यान नाशिकमध्ये अनेक वायनरीज, वाईनयार्डस असून या सर्वच ठिकाणी वर्षभर गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदाचा थर्टी फस्ट धुमधडाक्यात साजरा होत असल्याने या वायनरीज ला तुफान गर्दी झाली असून नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर निर्सगरम्य वातावरणात या वायनरीज आहेत. त्यामुळे थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी नाशिकच्या वाईन यार्डला पसंती दिली आहे.
सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards)
नाशिकमधील सुला वाईनयार्ड्स ही वाईनरी जगप्रसिद्ध आहे. गंगापूर सावरगाव रोडला ही वायनरी असून येथील वाईनचे प्रकार, वाईन बनवण्याची पद्धत आणि सुला फेस्ट युवा पिढीत खूपच लोकप्रिय आहे. तसंच आता इथे राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. ही वाईनरी 2000 साली लाँच करण्यात आली. सध्या या वायनरीचा आयपीओ देखील लाँच करण्यात आला आहे.
यॉर्क वाईनरी (York Winery)
नाशिक शहराजवळील सावरगाव परिसरात ही यॉर्क वायनरी आहे. सावरगाव परिसरातील यॉर्क वाईनरीचा हा परिसर देखील फारच सुंदर आणि गंगापूर बॅकवॉटरजवळ आहे. आपल्या कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत इथल्या सुंदर लँडस्कॅप, परफेक्ट वाईन आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी इथे तुम्हाला आनंद घेता येईल. इथली वाईन टूर तब्बल 30-40 मिनिटांची असून इथे मिळणारं फूडही खूपच बजेट फ्रेंडली असल्याचे सांगितले जाते.
सोमा वाईनयार्ड्स (Soma Vineyards)
गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गंगावर्हे शिवारात ही वायनरी वसलेली आहे. अतिशय नयनरम्य वातावरणात पाण्याशी संवाद साधत सोमा वाईन व्हिलेज ला भेट देता येईल. शहरी वातावरणापासून किंवा रोजच्या धावपळीच्या जगण्यातून शांतता हवी असेल तर इकडे नक्की भेट द्या. सोमा वाईनचा विस्तार आता लक्झरी रिसोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिलॅक्स होण्यासाठी आणि सोबतच वाईनचा आस्वाद घेण्यासाठी हे परफेक्ट डेस्टीनेशन आहे.
व्हॅलोनी (Vallonne Vineyards)
इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या कावनई शिवारात ही वायनरी वसलेली आहे. नाशिकपासून 45 मिनिटांच्या अंतरावर हायवेजवळ व्हॅलोनी वाईनयार्ड्स आहे. ही एक छोटीशी बुटीक वाईनरी असून छोट्याशा कुटुंबाला निवांत जागा आहे. इथे रस्टीक रूम्स आणि पुण्याचं प्रसिद्ध मलाका स्पाईस रेस्टॉरंट आहे. शहराच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमधून हेल्दी ब्रेक मिळवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. जिथे ना तुम्हाला इंटरनेट एक्सेस आहे ना फोन कनेक्शन. निसर्गाचा, चांगल्या जेवणाचा आणि चांगल्या वाईनचा आस्वाद या वायनरीला मिळतो.
टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट (Tiger Hill Vineyards Resort)
नाशिक-मुंबई मार्गावर विल्होळी गावानजीक ही वायनरी आहे. या परिसरातील टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट आणि स्पा हे एक मस्त रिसोर्ट आहे. जे नाशिक सिटीपासून मुंबईच्या रस्त्यालगत आहे. हा सगळा परिसर हिरवागार असल्याने तसेच भरपूर झाडं लावून हा भाग बनविण्यात आला आहे. तुम्हीही नाशिकजवळची वेगळी वाईनरी ट्राय करायच्या विचारात असाल तर इथे नक्की भेट द्या. कोणत्याही वाईन प्रेमीसाठी हा उत्तम अनुभव असेल. सुंदर इंटिरिअर्स, प्रसन्न वातावरण आणि वाईन्समुळे इथला स्टे नक्कीच मेमोरेबल असेल.
विनसुरा वाईनयार्ड्स (Vinsura Vineyards)
नाशिक शहराजवळील विंचूर गावानजीक विंचूर वाईन पार्क आहे. ही विंचूर वाईन पार्कमध्ये असून हे औरंगाबाद-नाशिक महामार्गावर असलेल्या विंचूर गावाजवळ आहे. गावानजीक असल्याने गावच वातावरण अनुभवायला मिळते. त्याचबरॊबर एका वेगळ्या धाटणीची वाईन या ठिकाणी मिळत असल्याने नेहमीच पर्यटकांचा राबता विंचूर वाईन पार्कला असतो. या ठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या वाईन्सचं टेस्टींग करता येतात. त्याचबरोबर फॅमिली ट्रिपचे आयोजन देखील करता येऊ शकत.