एक्स्प्लोर

Nashik Bus Accident : पुन्हा 8 तारीख ठरली नाशिककरांसाठी वेदनादायी.. अपघातावेळी नेमकं काय घडलं? आजीबाईंनी सांगितली आपबिती 

Nashik Bus Accident : नाशिकमध्ये दोन महिन्यांपूर्वी 08 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास बस आग अपघाताचा थरार पाहायला मिळाला होता.

Nashik Bus Accident : दुपारची सव्वा एकची वेळ...प्रवाशांनी खचाखच भरलेली बस... नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील चौफुलीवर आली असता, बस भरधाव वेगाने सुरु होती..अन् बसचे ब्रेक निकामी झाले...गतिरोधक असतानाही बस चालक बस रोखू शकला नाही, बस थेट पुढील शिवशाही बसवर आदळली. मात्र याचवेळी बसखाली दोन दुचाकी आल्याने क्षणार्धात बसने पेट घेतला. यात दोन्ही दुचाकीस्वारांचा होरपळून मृत्यू झाला. शिवाय प्रवाशांनी खचाखच भरलेली बस (Bus Accident) असल्याने तात्काळ बसमधून उड्या घेत आपले प्राण वाचविले. संगमनेरहून (Sagamaner) बसमध्ये बसलेल्या आजीबाईंनी बस अपघाताची आपबिती सांगितली. 

पुण्याच्या (Pune) राजगुरूनगर आगाराची बस राजगुरूनगर हुन नाशिकला (Nashik) निघाली होती. नाशिक शहरानजीक असलेल्या शिंदे टोल नाका परिसरात बस येताच चालकांना ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. याचवेळी गतिरोधक असल्याने अनेक वाहनांचा वेग कमी झाला होता. मात्र हि बस थेट पुढे असलेल्या शिवशाही बसला धडकली. मात्र याचवेळी नाशिकडे जात असलेल्या दोन दुचाकीस्वार या गाडीखाली आल्याने बसने ब्रेक दाबल्यानांतर लागलीच बसने पेट घेतला. यात पल्सर दुचाकीची पेट्रोल टाकी फुटल्याने बस अधिकच पेटली. यात दोन्ही दुचाकीवरील तरुणांचा अक्षरश कोळसा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर तातडीने स्थानिक रहिवाशांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जवळपास 43 हुन अधिक प्रवाशी बसमध्ये असल्याचे प्राथमिक माहिती  आहे. 

दरम्यान बस अपघातानंतर जखमींना तातडीने बिटको हॉस्पिटल आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. अनेकजण कामानिमित्त, महाविद्यालयात, नातेवाईकाकडे जात असल्याचे समजले. यातील अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या आजीबाईंनी अपघातांची आपबिती सांगितली. आजीबाईंसह त्यांची बहीण या दोघी संगमनेरहून नाशिकला नातेवाइकांकडे निघाल्या होत्या. बारा वाजेच्या सुमारास त्यांनी राजगुरूनगर-नाशिक बसमध्ये बसल्या. याचवेळी बस खाचखच भरल्याचे त्यांनी सांगितले. अनेकजण उभे होते, तर अनेकजण खाली बसून प्रवास करत होते. दरम्यान बस शिंदे टोलनाका क्रॉस केल्यानंतर शिंदे गावाजवळील चौफुलीजवळ आली असता बसचा वेग अधिकच होता. अचानक मोठा बार झाला. आरडाओरड सुरु झाली. आम्ही लागलीच हाती लागलं ते सामान घेऊन कसेबसे बसबाहेर आलो. जिवाच्या आकांताने उसासा देखील टाकला जात नव्हता, असे आजीबाई म्हणाल्या. काही वेळानंतर ऍम्ब्युलन्स आली, अन् आम्ही दोघी दवाखान्यात आलो.  

बरोबर दोन महिन्यानंतर बस फायर 
सद्यस्थितीत घटनास्थळावरून कोळसा झालेल्या बसचे अवशेष उचलण्यात येत असून काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी भेट दिली. त्याचबरोबर पोलिस पथकाकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. जखमींवर उपचार केले जात आहेत.  दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 08 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास बस आग अपघाताचा थरार पाहायला मिळाला होता. औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात देखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता.दरम्यान सिन्नर नाशिक महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला असून या दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यात महामंडळाच्या एसटी बसचा कागदासारखा पेट घेतला असून तात्काळ लोकांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Embed widget