(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : 'नाशिकमधून पळवायचे, परराज्यात विकायचे', अस पार पडलं 'ऑपरेशन मुस्कान'
Nashik Crime : ओझर (Ozar) येथुन अपहरण झालेल्या मुलीला (Child Trafficking) लग्नासाठी विकण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) दिलेली आहे.
Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून यात मुलींच्या (Abduction of girls) अपहरणांच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अशातच ओझर (Ozar) येथुन अपहरण झालेल्या मुलीला लग्नासाठी विकण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) दिलेली आहे. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून यामध्ये महिलेचा देखील समावेश आहे.
नाशिक शहर तसेच परिसरातून मुलींच्या अपहरणाच्या घटना चिंतेची बाब असून मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत महत्वाचे धागे दोरे सापडले आहेत. नाशिकच्या ओझरमध्ये लहान मुलींचे अपहरण करून परराज्यात विकणारी टोळी सक्रिय झाली होती. यामुळे पोलिसांचे धाबे दाणाणले होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान च्या अंतर्गत मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ओझर येथून एक चौदा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहीती घेतली असता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या टोळीचे संदर्भात ठोस माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात संशयितांच्या मागावर गेले. याठिकाणी या प्रकरणातील महिला संशयित आढळून आली.
नाशिक पोलिसांच्या पथकाने संबंधित महिलेची चौकशी केली असता सदर मुलीची विक्री गुजरातमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ गुजरात गाठत पुन्हा मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी रवाना झाले. या ठिकाणी विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.
मुख्य एजंट ओझर शहरातील...
दरम्यान अटक केलेल्या संशयितांमध्ये तीन महिला तर दोन पुरूषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ओझरमधील एक महिला पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. एका मुलीमागे एक लाख 75 हजार रुपये घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अस पार पडलं ऑपरेशन मुस्कान
ओझर शहरात दोन महिन्यात दोन मुलींचे अपहरण झाले. मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीमध्ये ओझर शहरातील महिलेचाच समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांकडून या ऑपरेशनला मुस्कान असे नाव देण्यात आले. ओझर गुन्हे शोध पथक पाच दिवस गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये तळ ठोकून होते. अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ओझर पोलिसांना यश मिळाले.