एक्स्प्लोर

Jalgaon News : मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा, खडसे कुटुंबीय अडचणीत? कोण आहेत मंदाकिनी खडसे?  

Jalgaon News : आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे.

Jalgaon News : आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या नावे असणार्‍या 33 हेक्टर 41आर जमीनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा (Fraud) करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप आज मुक्ताईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केल्याने जळगाव (jalgoan) जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणाची एसआयटीच्या (SIT) माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केली आहे.

नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु असून यामध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झालं असून तब्बल 400 कोटींचा महसूल बुडवला असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवाय प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री विखेंकडून देण्यात आल्याने मंदाकिनी खडसे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान या आरोपामुळे आता पुन्हा एकनाथ खडसे कुटुंबीय गैरव्यवहाराच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात  मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील 33 हेक्टर 41 आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, मंदाताई खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीनीची खरेदी करण्यात आली. या जमीनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली.

जानेवारी 2019 मध्ये आधीच एनए झालेल्या शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. आणि काही दिवसांमध्येच प्रांताधिकार्‍यांनी याला तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. यामुळे महसूल खात्याच्या आशिर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. खरं तर येथे 10 हजार ब्रासच्या उत्खननाची परवानगी होती. मात्र येथून लाखो ब्रास मुरूमासह अन्य गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रूपयांचा घोटाळा  झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला आहे. 

या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याच्या माध्यमातून याची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच त्यांनी एसआयटीचे आश्‍वासन देखील दिले आहे. आ चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Embed widget