Nashik Ganeshotsav : : नाशिकच्या तुरुंगातून घरोघरी जातायेत बाप्पा, कैद्यांनी साकारले पर्यावरण पूरक बाप्पा
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील (Central Jail) शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांनी बाप्पाच्या मूर्ती (Ganesh Idol) तयार केल्या असून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील (Central Jail) शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांनी फावल्या वेळात बाप्पाच्या मूर्ती (Ganesh Idol) तयार केल्या असून कारागृहाच्या बाहेर विक्री केंद्रावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सदर मूर्ती केंद्रावर नाशिककर बाप्पा खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे (Ganeshotsav) सर्वांनाच वेध लागले आहेत. यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून यासाठीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आपल्या हातानी सुबक मूर्ती तयार केल्या असून त्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तब्बल साडे पाचशे मूर्ती तयार करण्यात आल्या असून यामध्ये विविध प्रकारच्या मुर्त्यांचा समावेश असल्याने नाशिककर खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कारागृह प्रशासनाने यासाठी विशेष आवाहन केले आहे.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) बंदीवानांकडून अनेक कलाकुसरीची कामे केली जातात. यामध्ये सुतारकाम, विणकाम यांसह शेतीची कामेही केली जातात. अशातच दोन वर्ष कोरोनात बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडला. मात्र यंदा निर्बंध शिथिल करण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असून बाप्पाच्या आगमनासाठी अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदीवानांनी आपल्या हातातून बाप्पा घडविले आहेत. नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी वाहनांनी बनवलेल्या सुबक कलाकुसर शाडू मातीच्या मूर्ती पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी सध्या नाशिकच्या भाविकांनी कारागृहात बाहेरील विक्री केंद्रावर गर्दी केली आहे.
पर्यावरण पूरक गणेशमूर्ती
मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी निसर्गाला पोषक अशा मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार केल्या आहेत. या मूर्ती खरेदीसाठी दरवर्षी कारागृहाच्या विक्री केंद्रावर भाविक गर्दी करत असतात..दरम्यान बंदीवानांनी यंदाही पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यास प्राधान्य दिले आहे. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. इकोफ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यावर्षी देखील हे दालन पुन्हा उघडले असून जवळपास निम्या मूर्ती बुक झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे.
इत्यादी गणेशमूर्तीचा समावेश
या विक्री केंद्रावर सर्वात लहान बारा इंच मूर्ती असून, सर्वात मोठी 28 इंच मूर्ती आहे. लालबाग गणेश मूर्ती, फेटा गणेश मूर्ती, वक्रतुंड गणेश मूर्ती, लंबोदर गणेश मूर्ती, दगडूशेठ गांधी गणेश मूर्ती, त्रिमुखी गणेश मूर्ती, जास्वंद गणेश मूर्ती, गाय गणेश मूर्ती, मळ गणेश मूर्ती त्याचप्रमाणे लहान वक्रतुंड, मोठा वक्रतुंड, गजमुख लंबोदर, कमळ आदी प्रकारच्या गणेशमूर्ती कारागृहात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या मूर्तींची किंमत आठशे रुपयांपासून साडेचार हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे सध्या कारागृहाच्या विक्री केंद्रावर भाविक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.