Nashik GST News : नाशिकमध्ये उभारली बोगस कंपनी, केला 85 कोटींचा जीएसटीचा घोटाळा
Nashik GST News : नाशिकमधील (Nashik) एका कंपनीच्या माध्यमातून खोटी बिले (Bogus Bills) देऊन शासनाचे 85 कोटी रुपये बुडविणाऱ्या संशयिताला (Arrested) अटक करण्यात आली आहे.
Nashik GST News : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खोटी बिले देऊन शासनाचे 85 कोटी रुपये बुडविणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. जीएसटीच्या नावाखाली (राज्य) नाशिक विभागीय कार्यालयांकडून (Nashik GST Office) कारवाई करण्यात आली आहे. या कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.
नाशिक जीएसटी विभागीय कार्यालयांकडून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या करदात्यांविरोधात (Income Tax Payers) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक शहर परिसरातील युनायटेड स्टील ट्रेडर्स या प्रकरणाचा तपास करुन सुमारे 85 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरण उघडकीस आणले आहे. शिवाय या प्रकरणातील संशयितास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे.
दरम्यान राज्य शासनाच्या जीएसटी विभागाने खोटी बिले सादर करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्याविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. त्या अंतर्गत जीएसटीच्या नाशिक कार्यालयाच्या अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी येथील युनायटेड स्टील ट्रेडर्स कंपनीची चौकशी केली. यामध्ये फारुख रहीम खान याने बोगस कंपनी सुरु केली असल्याचे समोर आले. या कंपनीने मुंबई येथील बनावट कंपन्यांकडून तब्बल 85 कोटी रुपयांची बिले घेऊन तेरा कोटी रुपयांची जीएसटी वजावट प्राप्त केल्याचेव शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलाचे नुकसान केल्याचे उघड झाले. त्यामुळे खान याला कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
दरम्यान महाराष्ट्र वस्तू सेवा कर अधिनियम 2017 नुसार हा अजामीनपात्र गुन्हा असून या प्रकरणी खान यास न्यायालयात हजार केले असता त्यास 12 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिक क्षेत्राचे अप्पर राज्य कर आयुक्त सुभाष एंगडे, नाशिक विभागाचे राज्य कर सह आयुक्त हरिशचंद्र गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण विभागाने हि कारवाई केली आहे.
सध्या सुरु असलेल्या करचुकवेगिरीविरोधी मोहिमेतील हि चालू आर्थिक वर्षातील राज्यातील 29 वी कारवाई आहे. येत्या कालावधीत जीएसटी विभागाकडून मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती जीएसटी सह आयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांनी दिली.