एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : 'ठाकरे गट तुम्ही फोडला, तुम्ही भांडण लावलं, असलं काम पवार करत नाहीत'; भुजबळांचे प्रत्युत्तर 

Nashik Chhagan Bhujbal : चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत छगन भुजबळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Nashik Chhagan Bhujbal : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandraknat Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 'त्या' एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरु असून शिवसेनेच्या फुटीसाठी सुद्धा ते कारणीभूत असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव घेता आरोप केला आहे. यावर भुजबळांनी चोख प्रत्युत्तर देत ठाकरे गट फोडण्यामागे तुम्ही आहात, तुम्ही भांडण लावलं, अशी कामे पवार करत नाहीत, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ (Chhaga Bhujbal) यांनी दिले आहे. 

आज छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून शरद पवार देखील दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज सकाळी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. भुजबळ म्हणाले की, "शिवसेना फुटली, या फुटीमागे कुणाचा हात आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडण लावलं. अन् हे भाडं कुणी लावलं, हे देखील सर्वांना माहित आहे. असे काम पवार करत नाहीत.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "शरद पवार आज नाशिकमध्ये येत असून इंडियन प्रेस मजदूर संघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार नाही. त्याचबरोबर उद्या देवळाली मतदारसंघात (Deolali) काही कार्यक्रम आहेत. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या दौऱ्यात निवडणुकांची काही चर्चा होणार नाही." तसेच आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत देशात सुरु असलेल्या हिंडेनबर्ग या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. यावर भुजबळ म्हणाले की, "आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये, आपली बदनामी होता कामा नये. टाटा, बिर्ला यांनी देखील खूप चांगले काम केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचे? देशासह राज्यात इतर ही अनेक मुद्दे असून यावर चर्चा झाली नाही. मात्र काही लोकांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे मत कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही." 

अनेक मुद्द्यांवर भुजबळांचे भाष्य 

यावेळी भुजबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले की, "भक्तिभावाने मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्याला जावे, राजकारण करु नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून शिंदेंवर फार मोठी जबाबदारी पडली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, "अशा परिस्थितीत केसरकरांच्या वक्तव्याला महत्त्व नाही. फडतूस, काडतूस असे वक्तव्य होत आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना (ठाकरे गट) युती होईल असे वाटत नाही." दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती. यावर ते म्हणाले की, "अचानक आजारी असल्याने अजित पवार यांनी दौरा रद्द केला. त्यांनी सांगितले आहे की मला त्रास झाल्याने दौरा रद्द करत आहे." ईव्हीएम बंद करण्याच्या भूमिकेवर ते म्हणाले की, "ईव्हीएम बंद करावे ही मागणी आमची पण आहे. अनेक देशांनी ईव्हीएम बंद केले आहेत. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली असून त्यामुळे निवडणुकांत ईव्हीएम मशीन वापरु नये."

महत्त्वाच्या बातम्या

मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget