Nandurbar : लग्न असो की मुंज निमंत्रणाला 'हसमुख डान्सरच', नंदुरबारमध्ये हरेसिंग वळवीचा व्हिडीओ 'व्हायरल'
Nandurbar : नंदुरबारचा (nandurbar) हरेसिंग वळवी एकही रुपया न घेता घरोघरी जाऊन लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम करत असतो.
Nandurbar Haresingh Valvi : लग्न म्हटलं की सगळीकडे धामधूम सुरु असते. लग्नासाठी (Marriege) अनेक गोष्टीची तजवीज करावी लागते. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न पत्रिका. हल्ली निमंत्रण पाठवण्यासाठी (Invitation Card) अनेक हायटेक पद्धती आलेल्या असल्या तरीही ग्रामीण भागात आजही घरोघरी लग्नपत्रिका दिली जाते. नंदुरबारमध्ये (Nandurbar) असाच एक अवलिया एकही रुपया न घेता लग्न असो इतर काही कार्यक्रम घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम करत असतो. त्याचबरोबर निमंत्रण दिल्यांनतर स्थानिक लोकांचे डान्स करुन मनोरंजन करत आहे.
लग्नात लग्नपत्रिका या हमखास छापल्या जातात. मात्र हल्ली आमंत्रण पत्रिका पाठवण्याच्या हायटेक पद्धती वापरल्या जातात. कोणी व्हॉट्सअॅपवर तर कोणी इन्स्टावर तर कुणी कुरिअरने तर कुणी स्पीड पोस्टने पत्रिका पाठवत असतो. त्याचबरोबर डिजिटली लग्नपत्रिका (Digital Invitation) आल्याने अनेकदा लग्नपत्रिकांची छपाई करण्याचे कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर परिसरात आजही एक तरुण परिसरातील लग्न, जाऊळ, उत्तरकार्य याच्या पत्रिका परिसरातील आठ ते दहा गावात घरोघरी जाऊन वाटतो. त्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही. लग्न गरिबाच्या घरचे असो की श्रीमंताचे पत्रिका वाटण्यासाठी हरेसिंग वळवी (Haresingh Valvi) तयारच असतात.
मोबदल्याची अपेक्षा न ठेवता घरोघरी जाऊन आमंत्रण
अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील वाण्याविहिर येथील हरेसिंग वळवी यांची या परिसरात हसमुख डान्सर म्हणून ओळख आहे. परिसरातील दहा ते पंधरा गावात कुणाकडे लग्न असो, जावळ असो की उत्तरकार्य याच्या पत्रिका वाटण्याची जबाबदारी येते, ती हरेसिंगवर. तो कोणत्याही प्रकारची मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गावातील घरोघरी जाऊन आमंत्रण पत्रिका देत असतो. त्याचा मोबदला त्याला कधी मिळतो तर कधी नाही. मात्र लग्नकार्यातील सांस्कृतिकपणा कायम ठेवण्यासाठी हरसिंग स्वखर्चाने गावातील लग्नात जाऊन डान्सही करत असतो.
छंद जोपासण्यासाठी डान्स करतो...
आपल्या संस्कृती आपली कला टिकवण्यासाठी त्याच्यासोबत आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी हे कार्य करत असल्याचा तो सांगतो. मात्र हे कार्य करत असताना तो आपल्या घराचा उदरनिर्वाह स्वतःची शेती करुन करत असतो. कुठलाही मोबदला मिळावा, म्हणून तो काम करत नाही. माणसाला असलेला छंद जोपासण्यासाठी आपण पदरमोड ही करत असतो त्याचप्रमाणे आपला नाचण्याचा छंद जोपासण्यासाठी हरसिंग वळवी पदर मोड करुन घरपोच आमंत्रण देण्याचा काम करत आहे.