MSP : अनोखी लग्नपत्रिका! MSP च्या कायद्यासाठी शेतकऱ्याची शक्कल, मुलाच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा
उत्तर प्रदेशमधील (UP) सरहानपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नातील लग्नपत्रिकेमध्ये केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी MSP च्या कायद्यासंदर्भात उल्लेख केला आहे.
MSP : गेल्या अनेक दिवसांपासून विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) हमीभावाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. देशात MSP चा कायदा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अशातच MSP च्या कायद्यासाठी एका शेतकऱ्यानं अनोखी शक्कल लढवली आहे. उत्तर प्रदेशमधील (UP) सरहानपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेमध्ये ( wedding card ) केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी MSP च्या कायद्यासंदर्भात उल्लेख केला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या हमीभावाच्या कायद्याची जाणीव करण्याकरता वेगळ्या पध्दतीनं लग्नपत्रिका काढली आहे.
नेमका लग्नपत्रिक काय आहे उल्लेख
उत्तर प्रदेशमधील सरहानपुर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नातील लग्नपत्रिकेमध्ये केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी MSP च्या कायद्यासंदर्भात उल्लेख केला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या हमीभावाच्या कायद्याची जाणीव करण्याकरता वेगळ्या पध्दतीनं लग्नपत्रिका काढली आहे. या पत्रिकेत 'गाव गाव MSP, घर घर MSP, फलस हमारी भाव तुम्हारी (सरकार) नही चलेगा चलेगा' असा उल्लेख या लग्न पत्रिकेवर करण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांच्या पिकांना MSP चा कायदा लागू करावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा पिकांना हमीभाव मिळावा हा शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे देखील पत्रिकेत म्हटलं आहे.
MSP गॅरंटी किसान मोर्चाचं अधिवेशन
हमीभावाच्या मुद्द्यावरुन विविध शेतकरी संघटना (Shetkari Sanghatana) आक्रमक झाल्या आहेत. केंद्र सरकारनं हमीभावाचा (MSP) कायदा करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच व्ही एम सिंह (VM Singh) यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पंजाब खोर इथं MSP गॅरंटी किसान मोर्चाचं अधिवेशन आयोजीत करण्यात आलं होतं. या अधिवेशनात हमीभावाच्या मुद्यावर चर्चा झाली होती. 200 हून अधिक शेतकरी संघटना यामध्ये सामील झाल्या होत्या. पंजाब खोर गावातून MSP चा लढा सुरू झाला असून, तो आता देशातील प्रत्येक गावात पोहोचवला जाईल असे व्ही एम सिंह यांनी सांगितलं.
शेतकरी कुटुंबाने MSP च्या मोहिमेत सहभागी व्हावं
गेल्या महिन्यात झालेल्या किसान मोर्चाच्या अधिवेशनात 27 प्रांतातील 220 शेतकरी संघटना सामील झाल्या होत्या. या अधिवेशनात एमएसपी हमी किसान मोर्चाला पाठिंबा दिला. प्रत्येक शेतकरी कुटुंबाने या मोहिमेत सहभागी व्हावं, यासाठी गावोगावी प्रचार करावा असे मत व्ही एम सिंह यांनी व्यक्त केलं होतं. दरम्यान, प्रत्येक गावात भिंतीवर पेंटिंग, प्रभात फेरी काढून, बॅनर, पोस्टर लावून MSP चे फायदे प्रत्येक कुटुंबाला सांगण्यात येतील. MSP चे वातावरण निर्माण करण्यासाठी गाव समिती त्यांच्या पद्धतीने काम करेल असे ते म्हणाले होते. याचे मुख्य ध्येय आणि घोषवाक्य हे 'गाव गाव MSP, हर घर MSP' हे असेल असं सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: