एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये साडे चार हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली, ढोल ताशांचा गजर, देशभक्तीमय वातावरण 

Nashik News : स्वराज्य महोत्सव जनजागृतीसाठी नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासन (Nashik District), पोलिस प्रशासन, नाशिक महापालिका (Nashik NMC) यांच्या द्वारे शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. 

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Swatantryacha Amrut Mahotsav) अंतर्गत स्वराज्य महोत्सव जनजागृतीसाठी नाशिक (Nashik) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार विविध उपक्रम 9 ऑगस्टपासून महापालिकेतर्फे पार पडत आहेत. जिल्हा प्रशासन (Nashik District), पोलिस प्रशासन, नाशिक महापालिका आणि विविध खेळांच्या संघटना यांच्या द्वारे स्वराज्य महोत्सव जनजागृतीसाठी 12 ऑगस्टला शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. 

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. अशातच देशभरात घराघरात तिरंगा फडविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.  या प्रभातफेरीला राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. शहरातील जवळपास साडे चार हजार विद्यार्थ्यांना या प्रभातफेरीत सहभागी होत आनंद घेतला. 

संपूर्ण शहरात त्यामुळे देशभक्तीमय वातावरण तयार झालं होतं. प्रभात फे-यांमध्ये ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, स्काऊट पथक, गाईड पथक सैनिकी शाळेचे पथक सहभागी झाले होते. काही विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करुन आले होते. उर्दू शाळेसह शहरातील खासगी 45 शाळा आणि मनपाच्या 12 शाळांमधील विद्यार्थ्यांची रॅली निघाली. उंटवाडी येथील पेठे हायस्कूलमध्ये महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम, रावसाहेब थोरात सभागृह, शिवसत्य क्लब सहदेवनगर, विद्या प्रबोधिनी, न्यू ईरा स्कूल गोविंदनगर, एम.एस. कोठारी हायस्कूल, श्रीराम विद्यालय येथून प्रभात फेरींना सुरुवात झाली. 

गोल्फ क्लब मैदानावर समारोप 
राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) प्रभात फेरींचा समारोप झाला. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाधरन डी., महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिद्र कदम, महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिकारी सुनीता धनगर आदी अधिकारी उपस्थित होते. 

साडे चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग 
यावेळी खासगी शाळांमधील 3,500 आणि मानपाच्या 12 शाळांमधील एक हजार विद्यार्थी असे एकूण मिळून 4500 विद्यार्थ्यांचा प्रभात फेरीत सहभाग होता. काही विद्यार्थ्यांनी संबळ वाद्यही वाजवलं. झांज पथक, झेंडा पथकही सहभागी झाले होते. यावेळी देशभक्तीपर नृत्यही सादर केली. भोसला सैनिकी स्कुलचे विदयार्थी सैनिकी गणवेशात आणि बँड पथकासह सहभागी झाले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) इथं प्रभात फेरींचा समारोप झाला तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एकच जल्लोष दिसून आला. सिटी लिंकच्या 12 बसेस मधून मनपाच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर व झांज लेझीम पथकांनी सगळ्यांची मने जिंकली. 

सव्वा लाख ध्वज सदोष 
हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक महापालिकेला दोन लाख राष्ट्रध्वजांच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन लाख ध्वज प्राप्त झाले असून मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांमध्ये त्याच्या वितरण केले जात आहे. एक ध्वज वीस रुपयांना दिला जात आहे. गेल्या आठ दिवसात जवळपास 48 हजार नागरिकांनी ध्वज खरेदी केले. मात्र तब्बल सव्वा लाख ध्वज सदोष असल्याचे समोर आले आहे. हे ध्वजवंदन करणे योग्य नाही तसेच ध्वजामध्ये तिन्ही रंगाचा आकार एक समान नाही. तसेच ध्वजाचे कापड निकृष्ट दर्जेचे आहे. ध्वजाचे लांबी रुंदी मध्ये अनियमित्त असल्याच्या तक्रारी असल्याने महापालिकेने सदोष ध्वजांचे वितरण थांबवले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget