एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! युवकावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर 

Nashik Crime : नाशिक शहरातील (Nashik) औरंगाबाद नाका येथील क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना  घडली आहे. या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

Nashik Crime : नाशिक शहरात दिवसाढवळ्या गुन्हे होत असून कुणालाही कायद्याचा धाक राहिला नसल्याचे सद्यस्थितीवरून दिसते आहे. शहरातील औरंगाबाद नाका येथील क्रिकेट खेळणाऱ्या एका युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना  घडली आहे. या युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

नाशिक शहराच्या गुन्हेगारी संदर्भात पोलिसही हैरा हैराण झाले आहेत. एका मागोमाग एक खून, चाकू हल्ला आदी घटना सर्रासपणे उघडकीस येत आहेत. मात्र पोलीस हातावर हात धरून उभे आहेत कि काय असचं या घटनांवरून दिसून येते. शहरातील औरंगाबाद नाका येथील विजय कॉलनीतील देवी मंदिराजवळ एका युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दीपक डावरे असे या तरुणाचे नाव आहे. 

विजय कॉलनी येथील मैदानावर काही मुले खेळत होती. यामध्ये दिपकही क्रिकेट खेळत होता. अशातच सदाशिव झाबरे त्याच्या मित्रांसमवेत मैदानात आला. त्यांनी  दीपक याच्यावर चाकू हल्ला केला. हल्ला एवढा भयंकर होता कि, दिपकचा कोथळाच बाहेर पडला. या अवस्थेत हल्लेखोर सोडून पळाले. तर हल्ल्या वेळी इतर खेळणारे तरुणांनी देखील घटना पाहून पळ काढला. सध्या दिपकची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान नाशिककरांना खुनाची घटना काही नवीन नाही. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. घटना घडताच काही सुज्ञ नागरिकांनी पोलिसाना घटनेची माहिती दिली. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र शहरात सातत्याने होणाऱ्या अशा घटनांनी सामाजिक स्वास्थ बिघडत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नाशिकला झालंय काय?
नाशिकला झालंय काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. एकीकडे स्मार्ट शहर म्हणून ओळख असताना अलीकडच्या खुनाच्या घटना पाहता 'खुनी शहर' होतंय कि काय? असाही सवाल उपस्थित झाला आहे. गुन्हेगारी थोपवण्यासाठी नाशिक पोलीस या ना त्या मार्गाने गुन्ह्यांचा छडा लावत असताना एक गुन्हा मिटत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने नाशिक पोलीस देखील हैराण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Nashik And Raigad Guardian Minister Name: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 जणांची नावं जाहीर

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget