Jalgaon News : कुबरेश्वरहून परतताना भाविकांच्या वाहनास भीषण अपघात, जळगावच्या दोन महिलांचा मृत्यू
Jalgaon News : कुबरेश्वेर येथे गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला असून जळगाव येथील दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Jalgaon News : मध्यप्रदेशातील (Madhyapradesh) कुबरेश्वर (Kubereswher) येथील गर्दी अद्यापही नियंत्रणात येण्याचे नाव नसून आता प्रशासनाने रुद्राक्ष वाटणेच बंद केले आहे. अशातच कुबरेश्वेर येथे गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला असून दोन महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही महिला सिहोर येथे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या, मात्र घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर (Sihore) जिल्ह्यात असलेल्या कुबरेश्वर धाम महोत्सव (Kubershwer Dham) सुरु असून या महोत्सवातच्या पहिल्याच दिवशी पाच लाखाहून अधिक भाविक आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजते आहे. महोत्सवादरम्यान अनियंत्रित गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविक खाली हात घरी परतत आहे. याच दरम्यान, महोत्सवातून परत येत असतांना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशात अपघात झाल्याची घटना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील असे मृत महिलांचे नावं समोर आले आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांच्या चार वाहने 13 फेब्रुवारी रोजी सिहोरला शिवकथा महापुराण आणि रूद्राक्ष महोत्सवासाठी गेले होते. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले, मात्र रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांचे वाहने रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघाली. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाले. मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ ही वाहने आली असता यातील एका वाहनाचा अपघात झाला. यात वाहनातील शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये वाहनावरील चालक नितीन मंगल पारधी, निर्मला विनायक पाटील, राजकुवर नरेंद्र पाटील, मंगल भास्कर पाटील, कमलबाई रतीलाल पारधी, हे सर्व अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी आहेत. जखमींना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुद्राक्ष वाटप बंद
मध्य प्रदेशातील पंडित प्रदीप मिश्रा यांनी सिहोरे येथील कुबरेश्वर धाम येथे आयोजित केलेल्या रुद्राक्ष महोत्सवाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता आहे. कुबरेश्वर धाम महोत्सवात रुद्राक्ष प्राप्त करण्याच्या इच्छेने देशाच्या विविध भागातून पाच लाखांहून अधिक नागरिक यावेळी कुबरेश्वर धाममध्ये पोहोचले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या आगमनामुळे येथील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. लाखो भाविकांनी सकाळपासून सुरक्षांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र परिस्थिती नियंत्रण बाहेर गेल्याने रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गजरावर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे वाढतील गर्दी लक्षात घेता भाविक आता माघारी परतत आहेत.