Nashik Bus Accident : नाशिकमध्ये एसटीचा विचित्र अपघात! ब्रेक फेल झाला... बाईकस्वारांना चिरडले अन् पेट घेतला!
Nashik Bus Accident : नाशिक शहरानजीक बसने पेट घेतला असून अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे
Nashik Bus Accident : नाशिक (Nashik) पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघात (Major Accident) झाला. यात एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघातानंतर एस टी बसने पेट असल्याने जळून खाक झाली आहे. कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यात दोन ते तीन बाईकमध्ये अडकल्या.अपघातानंतर बसने पेट (Bus Accident) घेतला. पेट घेतलेली एसटी राजगुरू नगर आगाराची असल्याचे समजते आहे.
नाशिकच्या औरंगाबाद चौफुलीवर (Bus Fire) घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नाशिक शहरात घडली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शिंदे पळसे टोल नाका परिसरात दोन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसने पेट घेतला आहे. या भयंकर अपघातात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून अपघात झाल्यानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे सद्यस्थितीत हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट असून यंत्रणेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात देखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सिन्नर नाशिक महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला असून या दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यात महामंडळाच्या एसटी बसचा कागदासारखा पेट घेतला असून तात्काळ लोकांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार या अपघातात आठ ते दहा जण जखमी असल्याची माहिती असून हि बस पुणे ते नाशिक असा प्रवास करत होती. शिंदे टोल नाका परिसरात आली असता अचानक बसच्या समोर दुचाकीस्वार आल्याने अपघात झाला. तात्काळ गाडीतील प्रवाशांनी खिडकीतून उडया घेतल्या, तर काहींनी दरवाजातून बाहेर पडले. अचानक ब्रेक दाबल्याने अनेक प्रवाशांवर एकमेकांवर आदळल्याने जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यामध्ये काही प्रवाशांना बिटको हॉस्पिटल तर काही प्रवाशांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील प्रवाशी हे काही संगमनेर, पुणे, तर काही प्रवाशी सिन्नरहून बसल्याचे जखमींपैकी काहींनी सांगितले.