एक्स्प्लोर

Nashik : नाशिकमध्ये खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, हॉस्पिटलच्या ICU मध्ये केले वार, हल्लेखोर फरार

Nashik Crime : पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री येथे एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाला आहे, पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये (Suyog Hospital) रात्रीच्या वेळेस ही घटना घडली आहे. हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार आहे. घटनेची माहिती समजताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक, उपचार सुरू

नाशिक पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. डॉ. राठी हॉस्पिटलमध्ये असताना एक व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आला, त्यावेळी डॉ. राठी आणि त्या व्यक्तीमध्ये यांच्यात बोलणे झाले. काही वेळाने पुन्हा दुसऱ्या कॅबिनमध्ये दोघेही चर्चा करण्यासाठी गेले असता, त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, त्यावेळी त्या व्यक्तीने कॅबिनची कडी लावून धारदार कोयता काढून डॉ. राठी यांच्या डोक्यावर तसेच मानेवर वार केले. अज्ञात हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात डॉक्टर राठी गंभीर जखमी झाल्याने प्रकृती चिंताजनक असून त्यांव्यावर उपचार सुरू आहे. 

डॉक्टर-पेशंट असा वाद नाही - नाशिक पोलीस आयुक्त

सुयोग हॉस्पीटलमधील डॉक्टरवरील हा हल्ला खाजगी कारणातून झाला आहे. मात्र डॉक्टर-पेशंट असा वाद नाही असं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलंय

नाशिकमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्यात वाढ

यापूर्वी 2022 मध्ये सुद्धा अशा प्रकारची घटना समोर आली होती. नाशिकमध्येप्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. डॉक्टर प्राची पवार यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली होती. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला होता, ज्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली होती. 

हेही वाचा>>>

Crime : 'वर्क फ्रॉम होम' नोकरी द्यायचा, परदेशातून कमवत होता 'म्होरक्या', 23 राज्यातील 160 जणांची कोट्यवधींची फसवणूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Embed widget