एक्स्प्लोर

Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढणार, शिवसेनेला कधीही सोडणार नाही, शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Shubhangi Patil : झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही," अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिली.

Shubhangi Patil : "40 हजार मते पडणं हे एका सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. झाशीची राणी लढली, तसं मला लढायचं आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही," अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil)यांनी दिली. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला.

जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला : शुभांगी पाटील

या निकालावर प्रतिक्रिया देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, "40 हजार मते पडणं एक सामान्य घरातील लेकीला फार विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणी सरपंच देखील झालं नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मतं मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचं आहे. यात जुन्या पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार."

सत्यजित तांबे 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले. सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्यामुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. 

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल

एकूण मतदान -  1 लाख 29 हजार 615

=========================
➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999
➡️ शुभांगी भास्कर पाटील : 39534
➡️ रतन कचरु बनसोडे :2645
➡️ सुरेश भिमराव पवार :920
➡️ अनिल शांताराम तेजा :96
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
➡️ अविनाश महादू माळी :1845
➡️ इरफान मो इसहाक :75
➡️ ईश्वर उखा पाटील :222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
➡️ नितीन नारायण सरोदे :267
➡️ पोपट सिताराम बनकर :84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187
➡️ वैध मते : 116618
➡️ अवैध मते : 12297
➡️ एकूण :129615
➡️ कोटा : 58310

VIDEO : Shubhangi Patil : झाशीच्या राणीसारखं लढणार,शिवसेना कधीही सोडणार नाही

संबंधित बातमी

Satyajeet Tambe : सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं, विजयानंतर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया; उद्या करणार भूमिका स्पष्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaZero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Embed widget