एक्स्प्लोर

Satyajeet Tambe : सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं, विजयानंतर सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया; उद्या करणार भूमिका स्पष्ट 

4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर तांबेंनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला.

Satyajeet Tambe : "सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं," अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी दिली. राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. निकाल लागल्यानंतर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. दरम्यान 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच मी पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. 

बाद मतदानामुळे मताधिक्य कमी झालं

या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल असेही तांबे म्हणाले. मतदान बाद होण्याचं प्रमाण मोठं आहे. बाद मतदानामुळे माझे मताधिक्य कमी झाल्याचेही तांबे यावेळी म्हणाले. या निवडणुकीची प्रक्रिया क्लिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन 

नाशिक पदवीधर निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर अनेक लोकांकडून अभिनंदनाचे फोन आले. त्या सर्वांचे सत्यजीत तांबे यांनी आभार मानले. या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिल्याचे तांबे म्हणाले. मी लोकांना प्रेम दिलं आहे, पैसे वाटले नाहीत. मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असेही सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले.

सत्यजित तांबे 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी

नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. सत्यजीत तांबेंना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना 39 हजार 534 मतं मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेंमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला. युवा नेतृत्व, गेल्या अनेक वर्षांपासूनची संघटनात्मक बांधणी, वडील सुधीर तांबे यांनी मागील तीन पंचवार्षिक बांधलेला मतदारसंघ, सत्यजीत तांबे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत काम करत आहेत. जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार अशी मोर्चेबांधणी केली आहे. या सगळ्यांचा सत्यजीत तांबे यांच्या विजयात मोठा वाटा आहे. 

VIDEO : Satyajeet Tambe "पैसे नाही, आम्ही लोकांना प्रेम दिलं," विजयानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik MLC Election : चौथी टर्मही तांबे कुटुंबियांकडं, बहुचर्चित निवडणुकीत सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
Embed widget