Nashik Gram panchayat Result : नाशिक तालुक्यासह इगतपुरी, सिन्नरचा ग्रामपंचायत निकाल जाहीर, पाहा तुमच्या गावचा सरपंच कोण?
Nashik Grampanchayat Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत निवडणुकीत नाशिक तालुका, सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील सरपंचाची यादी पहा.
Nashik Grampanchayat Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींपैकी सात पैकी तीन तालुक्यातील निकाल जाहीर झाला असून नाशिक तालुका, सिन्नर, इगतपुरी तालुक्यात महाआघाडीचे वर्चस्व दिसून आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप शिंदे गटाला समाधान मानावे लागले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून जिल्ह्यातील एक एक ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहेत.
दरम्यान नाशिक (Nashik) तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchayat) सात गावच्या सरपंचदाच्या निवडणुकीत (Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वर्चस्व मिळविले आहे. त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वाधिक पाच ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. प्रत्येकी दोन ग्रामपंचायती भाजप, शिंदे गट आणि अपक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकता आली आहे. 13 ग्रामपंचायतींच्या निकालात भाजपने 2, शिवसेना उद्धव ठाकरे गट 5, शिंदे गट 2, काँग्रेस1 राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 2 अशा एकुण 13 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीने 13 सरपंचांपैकी 7 ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे. तर एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन होलिन, परिवर्तन पॅनलचे सागर बारमाटे यांना समान मते मिळाली आहेत. त्या चिट्ठी काढून निवड करण्यात आली. त्यात सचिन होलीन हे विजयी झाले आहेत.
तर सिन्नर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे निकाल (Gram Panchayat Results) जाहीर झाले असून सर्वच ग्रामपंचायतींवर अटीतटीचे सामने रंगल्याचे पाहायला मिळाले. या १२ ग्रामपंचायतींपैकी ठाणगाव, डूबेरेवाडी, वडगाव पिंगळा, सायाळे, लोणारवाडी व कारवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाचे तर शहा, पाटपिंप्री, उजनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाचे सरपंच निवडून आले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून मुंढेगाव सरपंच पदी ठाकरे गटाच्या मंगला चंद्रकांत गतीर तर वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादीच्या सुनीता काशिनाथ कोरडे या विजयी झाल्या आहेत. दरम्यान वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना 239 मते पडली. तर यावेळी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. कस्तुरी वैभव बोरकर या विद्यार्थिनीने चिठ्ठी काढली असता मोनिका भालेराव या विजयी झाल्या. निकाल जाहीर झाल्यावर मोनिका भालेराव यांना आनंदाश्रू अनावर झाले, यावेळी त्यांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलीला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नाशिक तालुका सरपंच
किरण कोरडे (गिरणारे, शिंदे गट), कचरू वागळे (महिरावणी शिंदे गट), मालती डहाळे (गणेशगाव ठाकरे गट), रवींद्र निंबेकर (तळेगाव ठाकरे गट), अगस्ति फडोळ (यशवंतनगर भाजप), शरद मांडे (बेलगावढगा अपक्ष), कविता जगताप (सामनगाव ठाकरे गट), पार्वता पिंपळके (देवरगाव काँग्रेस), प्रिया पेखळे (ओढा-ठाकरे गट), लेखा कळाले (लाडची-अपक्ष), एकनाथ बेझेकर (दुडगाव-ठाकरे गट), अरुण दुशिंग (एकलहरे-भाजप), सुरेश पारधे (साडगाव- राष्ट्रवादी)
सिन्नर तालुका सरपंच
आशापुर, सुलोचना सीताराम पालवे, कृष्ण नगर डुबेरवाडी, दत्तू गोफणे (वाजे गट / उद्धव सेना), कीर्तागंळी कुसुम शांताराम चव्हाणके (कोकाटे गट/ राष्ट्रवादी), कारवाडी रूपाली निलेश जाधव (वाजे गट /उद्धव सेना), शास्त्रीनगर - जयश्री सदाशिव लोणारे (वाजे गट/उद्धवसेना), नांदूर शिंगोटे - शोभा दीपक बरके ( वाजे गट / उद्धव सेना), पाटपिंपरी - नंदा रमेश गायकवाड (कोकाटे गट / राष्ट्रवादी), शहा - संभाजी जाधव ( कोकाटे गट /राष्ट्रवादी), सायाळे - विकास शेंडगे ( वाजे गट/ उद्धव सेना), ठाणगाव - नामदेव शिवाजी शिंदे (वाजे गट/ उद्धव सेना), उजनी - निवृत्ती लहानु सापनर ( कोकाटे गट/ राष्ट्रवादी), वडगाव पिंगळा - शेवंताबाई मुठाळ (वाजे गट/ उद्धव सेना).
इगतपुरी तालुका सरपंच
मंगला चंद्रकांत गतीर (मुंढेगाव-ठाकरे गट), सुनीता काशिनाथ कोर (वासाळी-राष्ट्रवादी)