एक्स्प्लोर

Dada Bhuse : नाशिकमधील 15 ब्लॅक स्पॉट दिवाळीपर्यंत दिसणार नाहीत, पालकमंत्री दादा भुसे यांची ग्वाही 

Dada Bhuse : दिवाळीपर्यंत (Diwali) नाशिक शहरात ब्लॅक स्पॉट दिसणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

Dada Bhuse : नाशिकला (Nashik) झालेला अपघात अतिशय दुर्दैवी असून नाशिक शहरातील ब्लॅक स्पॉट (Black Spot) सर्व्हे करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या दिवाळीपर्यंत (Diwali) नाशिक शहरात ब्लॅक स्पॉट दिसणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्याचबरोबर शहर विकासासाठी रस्त्यांची दुरुस्ती (Road Potholes) प्रकर्षाने केली जाणार आहे. यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या असल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यावेळी सांगितले. 

मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. पालकमंत्रीपदाची धुरा हातात घेतल्यानंतर दादा भुसे यांनी पहिलीच जिल्हा नियोजन आढावा बैठकीचे (Nashik District Review Meeting) आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर झालेला अपघात (Nashik Bus Fire Accident) मन सुन्न करणारा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार तातडीने विभागाची बैठक घेण्यात आली असून त्यानुसार शहरातील 15 ब्लॅक स्पॉट डिटेक्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार आता संबंधित विभागाला सूचना देऊन हे ब्लॅक स्पॉट रस्ते वाहतुकीसाठी कसे सुखकर होतील? यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. 

ते पुढे म्हणाले  शहरातील ब्लॅक स्पॉट दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे कामकाज केले जाणार आहे. ही समिती डिटेक्ट केलेल्या ब्लॅक स्पॉट काम करणार असून टाय त्या ठिकाणी अपघात कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील यासाठी आरखडा तयार करेल. शिवाय यापूर्वीच ज्या घटनास्थळी अपघात झाला, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरसह इतर वाहतुकीची सुविधा करणे आवश्यक होती, मात्र तसे झाले नाही. वेळीच उपपयोजना केल्या असत्या तर आज हा भीषण अपघात टाळता आला असता? अशी खंत यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलून दाखवली. 

कांडा खरेदीचा वांदा 
नाफेडची कांदा खराब झाला त्याची चौकशी करण्याचे देखील दादा भुसे यांनी यावेळी आदेश दिले आहेत. कांदा खरेदी हस्तक्षेप योजना राबविली जाते, दर स्थिर असतो, जो कांदा खरेदि केला, तो खराब झाला पडून राहिला, तो कांदा वेळेवर बाहेर गेला असता तर चाळीस टक्के नुकसान झाले नसते, ते प्रमाण टाळता आलं असत. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्याचे पंचनामा करून सरकारला अहवाल दिला जाणार आहे. वीजेचा जळलेला ट्रेसनफार्मर दोन तीन दिवसात दुरुस्त करावा, दिवाळीत वीजपुरवठा खंडित नसावा  अशा अनेक सूचना दादा भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.  

जिल्ह्यातील विकासाचा आराखडा 
आगामी कुंभमेळ्यासंदर्भात देखील दादा भुसे यांनी सूचना दिल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करावे, जनतेच्या सूचनांसाठी पोर्टल तयार करणे. त्यावर दोन तीन महिन्यात जनतेच्या सूचना घेणार. सप्तश्रृंगी गडावर वाढती गर्दी लक्षात घेता नवा विकास आराखडा तयार करणार.हुतात्मा स्मारकाचे दुरुस्ती, परिसर सुशोभित करत, वाचनालय अभ्यासिका करण, आरोग्य शिक्षण यावर भर देणार, यासह दादा भुसे यांनी नाशिक-मुंबई महामार्गवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शंभर शाळा मॉडेल स्कूल करणार. शाळा आणि शासकीय दवाखाना सौर उर्जेवर चालविण्यासाठी प्रयत्न करणार, त्यामुळे वीजेचे बील आणि वीज वापरात बचत होईल. याबोतच नाशिकमधील हुतात्मा स्मारक नूतनीकरण करणार, तिथे वाचनालय सुरू करणार. एकही रुपया परत जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजचे असल्याचे ते म्हणाले. शिवाय पुणे नाशिक रेल्वेमार्गासह आयटी क्षेत्र, विविध कंपन्या आदींवर भर देणार असून नाशिकला ब्रँडिंग करायला हवं, फोकस करायला लागणार आहे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. बंदरे व खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांनी याबाबची माहिती दिली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विकास कामातील निधीचं न्याय वाटप करणार आहोत. आधी निधी वाटपात असमतोल होता. काही तालुक्यात खूप खर्च, तर काही तालुक्यात निधी कमी असे होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात बदल करणार अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शेवटच्या बैठकीत निधी वाटप केला होता. मंत्री भुसे यांच्या या निर्णयामुळे छगन भुजबळ यांना नव्या पालकमंत्र्यांनी दणका दिल्याचे बोलले जात आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget