एक्स्प्लोर

Sanjay Raut Nashik : पहिला चौकार, दुसरा षटकार, नाशिकमध्ये संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी

Sanjay Raut Nashik : नाशिकमध्ये (Nashik) संजय राऊत यांनी बॅट हातात घेत चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

Sanjay Raut Nashik : संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर असून दौऱ्याच्या सुरवातीला त्यांनी बॅट हातात घेत चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवर चेंडू सीमारेषेबाहेर तर दुसरा चेंडू थेट मैदानाबाहेर पाठवत क्रिकेटच्या मैदानातही त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. 

शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष संवाद मेळावा (Samvad Melava) आयोजित करण्यात आला आहहे. या माध्यमातून शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांशी ते वन टू वन चर्चा करणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांचा आजचा दौरा महत्वाचा ठरणार आहे. दौऱ्याच्या सुरवातीलाच त्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरत गोलंदाजास धु धु धुतले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील टाळ्यांची बरसात केली. 

नाशिक मध्ये जाऊयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामनाच्या अग्रलेखातनं किंवा आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांना ते चांगलेच फटकारे लगावत असतात. आज ते खऱ्याखुऱ्या क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. नाशिकचा हा दौरा शिवसेनेसाठी विशेष महत्त्वाचा असून कारण शिवसेनेचे ठाकरे गटातनं शिंदे गटात आउटगोइंग होण्याची शक्यता जास्त आहे. मतभेद आहेत, नाराजी आहेत ही सगळी नाराजी थोपवायची आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाची बांधणी भक्कमरित्या करण्याचा आव्हानसुद्धा संजय राऊत यांच्यासमोर असेल. त्यांना जामीन मिळाल्यानंतरचा त्यांचा पहिलाच राज्यातला दौरा आहे. या दौऱ्या दरम्यानच क्रिकेट खेळण्याचा आनंद संजय राऊत लुटला आहे.

राजकारणात शब्दांची फटकेबाजी करणं हे कौशल्य असतं आणि शब्दांची फटकेबाजी संजय राऊत कायम करत असतात. आणि बॅट आणि बॉल सोबत  खरी खरी फटकेबाजी संजय राऊतनी केल्याचं पाहायला मिळाल. यानंतर ते शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. नाशिक दौऱ्यावरती असताना अनेक आव्हान त्यांच्या समोर आहेत. पक्षाची बांधणी करणे, शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्थात नाशिकमध्ये सुद्धा शिवसेनेत दोन गट पाहायला मिळतात. नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे सध्या शिंदे गटांसोबत आहेत. महापालिकेच्या निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात. त्या दृष्टीने सुद्धा ठाकरे गट मजबूत करणं, नाराजी दूर करण या सर्व बाबींकडे संजय राऊत त्यांना लक्ष द्यावे लागणार असल्याचे दिसते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget