एक्स्प्लोर
Advertisement
मोठी बातमी : भारतीय वायू दलाच्या विमानाचा भीषण अपघात, नाशिकमध्ये कोसळलं विमान
IAF Plane Crash : भारतीय वायू दलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. वायूदलाचं विमान नाशिकमध्ये कोसळल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
नाशिक : भारतीय वायू दलाच्या (Indian Air Force) विमानाला अपघात झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. नाशिकमध्ये वायूदलाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. वायूदलाचं विमान कोसळल्याची महत्त्वाची बातमी आहे. नाशिकच्या पिंपळगावजवळ शिरसगाव परिसरात विमान कोसळलं आहे. वायू दलाचं विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारतीय वायू दलाच्या विमानाचा भीषण अपघात
वायू दलाचं विमान नाशिकमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. वायूदलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. वायू दलाचं विमान कोसळलं, विमानाचे तुकडे-तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला. दरम्यान, या दुर्घटनेत सुदैवाने पायलट बचावले आहेत. पायलट पॅराशुटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघाताचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement