Hemant Godse : आलिशान गाड्या, सोने, शेअर्ससह अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक, हेमंत गोडसेंची संपत्ती नेमकी आहे तरी किती?
Hemant Godse Property : गोडसे दाम्पत्याकडे तीन चारचाकी वाहने आहेत. गोडसे यांना स्वमालकीची व वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. देवळाली कॅम्पला ऑफिस आहे. संसरी व लॅम रोडला घर, सदनिका आहेत.
Hemant Godse नाशिक : सुमारे महिनाभरापासून रखडलेला नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा अखेर सुटला. नाशिकमधून पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
खासदार हेमंत गोडसे यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे एकूण सोळा कोटींची संपत्ती (Hemant Godse Property) आहे. खासदार गोडसेंच्या नावे 13 कोटी 38 लाखांची तर पत्नी अनिता गोडसेंच्या (Anita Godse) नावावर दोन कोटी 82 लाखांची संपत्ती असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.
हेमंत गोडसेंवर साडे पाच कोटींचे कर्ज
विशेष म्हणजे खासदार गोडसेंवर, साडेपाच कोटींचे तर पत्नीच्या नावे एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत खासदारांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी अचल संपत्ती सव्वासहा कोटींवरून सव्वापाच कोटींपर्यंत घसरण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेमंत गोडसेंच्या संपत्तीत वाढ
खासदार हेमंत गोडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 2019 मध्ये साधारणतः साडेसहा कोटींची संपत्ती होती. अचल संपत्तीत रेणुका बिल्डकॉन, गुरू एटरप्रायझेस, जय मातादी एंटरप्रायझेस, मातोश्री एंटरप्रायझेस, याप्रमाणे विविध संस्थांमध्ये त्यांचे समभाग आहेत. गोडसे दाम्पत्याकडे तीन चारचाकी वाहने आहेत. गोडसे यांना स्वमालकीची व वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत. देवळाली कॅम्पला ऑफिस आहे. संसरी व लॅम रोडला घर, सदनिका आहेत. 2024 पर्यंत या संपत्तीत 10 कोटींची वाढ वाढ झाल्याचे दिसून येते.
सोने, शेअर्ससह अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक
सद्यस्थितीला त्यांच्याकडे पाच लाख सात हजारांची रोख रक्कम आहे. तर त्यांची चल संपत्ती 8 कोटी 8 लाखांची असून, अचल संपत्ती पाच कोटी 30 लाखांवर आहे. पाच लाख 56 हजार रुपयांचे कर्जही गोडसेंनी घेतले आहे. पत्नीच्या नावे दोन कोटी 29 लाखांची चल संपत्ती तर, 53 लाख 21 हजारांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याही डोक्यावर एक कोटी पाच लाखांचे कर्ज असल्याचे गोडसेंनी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. तर विविध बँकांमध्ये ठेवी, बचत खात्यात रक्कम, सोने, शेअर्स यामध्येही चांगली गुंतवणूक असल्याचे दिसून येते.
भक्ती गोडसेंच्या नावावर 19 लाखांची संपत्ती
त्यांची सून भक्ती अजिंक्य गोडसे (Bhakti Godse) यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे त्यांच्या नावावरील संपत्तीही समोर आली आहे. भक्ती गोडसे यांच्या नावे 19 लाख 73 हजारांची चल संपत्ती तर तिचे पती अजिंक्य गोडसे (Ajinkya Godse) यांच्या नावावर दोन कोटी 9 लाख रुपयांची चल संपत्ती असल्याचे दिसून येते. अचल अर्थात स्थावर मालमत्ता त्यांच्या नावावर नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
आणखी वाचा