(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dada Bhuse : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी कपातीबाबत पालकमंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा, म्हणाले...
Nashik Water Crisis : नाशिकच्या धरणातील पाणीसाठा खालवल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. आता याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे.
नाशिक : जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला तरीदेखील नाशिक जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झालेली नाही. त्यातच मागील वर्षी नाशिकमध्ये दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे नाशिककरांवर भीषण पाणी टंचाईचे (Water Scarcity) संकट ओढावले आहे. येत्या काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पावसाला बरसला नाहीतर नाशिकमध्ये पाणीकपातीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पाणीकपातीबाबत मोठी घोषणा केली आहे.
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्याला अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्यात नाशिकमध्ये फारसा पाऊस बरसला नाही. काल नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवली आहे. नाशिकमधील धरणातील पाणीसाठाही आता खालवला आहे. मात्र आता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दादा भुसे यांनी मोठी घोषणा केली आहे.
नाशिककरांवर पाणी कपातीची वेळ येणार नाही : दादा भुसे
पाणीकपातीबाबत दादा भुसे म्हणाले की, नाशिककरांवर पाणी कपातीची वेळ येणार नाही. गेल्या काही दिवसापासून समाधानकारक पाऊस सुरू आहे. मालेगावसह काही भागात पाणी टंचाई होती. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु होता.आता मात्र हळूहळू पाणीपुरवठा सुरळीत होत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळणार असल्याचे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुजबळ-पवार भेटीवर दादा भुसेंची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत दादा भुसे म्हणाले की, भेटीबाबत छगन भुजबळ बोलतील. ते कोणत्या कामासाठी गेले हे तेच सांगतील. भुजबळांनी याआधी पवार पवार साहेबांबरोबर काम केले आहे. ही राज्याची संस्कृती आहे. मराठा आरक्षणासारखे महत्वाचे प्रश्न आहेत. यात सर्व पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली होती. तेव्हा विरोधी पक्षनेते आले नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
Dada Bhuse : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसेंची गाडी अडवली; नेमकं घडलं तरी काय?