शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन प्रक्रियेतून जावे लागत असते. राज्य शासनाची जन्म आणि मृत्यू नोंदणी वेबसाईट ही मागील पंधरा दिवसांपासून ठप्प असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक : शासनाची जन्म-मृत्यू (Birth & Death Crtificate) नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद आहे. वेबसाईट बंद (Website Closed) असल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जन्म-मृत्यू दाखला अर्जासाठी 15 ते 20 दिवस लागत आहेत. वेबसाईट सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याने प्रक्रियेला विलंब होत असल्याती माहिती समोर आली आहे.
जन्म-मृत्यू दाखला मागणी अर्जानंतर तीन दिवसात मिळणे अपेक्षित असताना 15 ते 20 दिवसाचा वेळ लागत आहे. शासनाची वेबसाईट सॉफ्टवेअर अपडेट होत असल्याने ऑनलाइन प्रक्रियेला विलंब लागत असल्याची प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शासकीय वेबसाईट बंद असल्याने नागरिक जन्ममृत्यू दाखल्यांसाठी तासनतास कार्यालयात बसून आहेत.
ऑनलाईन प्रक्रिया सध्या ठप्प
शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन प्रक्रियेतून जावे लागत असते. राज्य शासनाची जन्म आणि मृत्यू नोंदणी वेबसाईट ही मागील पंधरा दिवसांपासून ठप्प असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय वेबसाईट सॉफ्टवेअर अपडेटमुळे दाखले मिळवण्यास विलंब होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे. नवीन योजनांच्या वेबसाईटमध्ये ऑप्शन अपडेट होत असल्यामुळे हा विलंब लागत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे सर्वच ऑनलाईन प्रक्रिया ही सध्या ठप्प असल्याचं दिसून येत आहे.
नागरिकांची मोठी गैरसोय
जन्म आणि मृत्यू दाखला मागणी अर्जानंतर तीन दिवसात नागरिकांना मिळणे अपेक्षित असताना जवळपास या दाखल्यांसाठी 15 ते 20 दिवस इतका कालावधी लागत असल्याची परिस्थिती नाशिकच्या पालिका जन्म मृत्यू विभागाच्या कार्यालयात पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात नागरिकांना तासनतास बसून राहावे लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
अडचणी येत असल्याने विद्यार्थी हवालदिल
प्रत्येक नागरिकाला कोणत्याही शासकीय कामांसाठी जन्म मृत्यू दाखल्याची आवश्यकता भासते. सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून जन्म दाखला प्रवेशासाठी महत्वपूर्ण असतो. नुकतंच शाळा महाविद्यालयात शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. त्यासाठी अनेकांना जन्माचे दाखले (CRS Portal) पाहिजेत तर काही मुलांना उच्च शिक्षणसाठी परदेशी जायचे आहे. त्यासाठी दाखला आवश्यत आहे मात्र त्यातही अडचणी येत असल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
हे ही वाचा :
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना