भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar met Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची मोठी ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे, असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले.
![भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar met Chhagan Bhujbal No one can dominate Chhagan Bhujbal great strength of OBC behind him Nashik Maharashtra Politics Marathi News भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद : गोपीचंद पडळकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/12/271d5d9ee0c0f5ef8351cbc215562bfb1715502893250923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News नाशिक : धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली. नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळ आणि पडळकर यांच्यात बैठक झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर यांनी भुजबळ साहेबांना कोणीही डॉमिनेट करू शकत नाही, त्यांच्यामागे ओबीसींची मोठी ताकद आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, काल नाशिकमध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता. या मेळाव्याच्या निमित्ताने मी नाशिकमध्ये आलो होतो. आज महायुतीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भेटीचे विशेष कारण नाही कारण ते आमचे नेते आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर भुजबळ साहेबांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेने मी त्यांना भेटलो.
भुजबळ साहेबांसोबत मी चळवळीत
महायुती (Mahayuti) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) ताकतीने लढते आहे. महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहे त्यामुळे अनेक नेते त्यांना भेटतात. मी कार्यकर्ता आहे. भुजबळ साहेबांसोबत चळवळीत आहे. त्यामुळे माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतात ती वेगळी भेट असते, असे त्यांनी म्हटले.
छगन भुजबळ यांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही
ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ यांना कोणी डॉमिनेट करू शकत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींची (OBC) मोठी ताकद भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आहे. भुजबळ साहेबांनी मी निवडणूक लढणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ओबीसींची ताकद तीच आहे आणि ही ताकद पुढे वाढेल, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
भुजबळांच्या अनेक नेत्यांसोबत भेटीगाठी
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राजकीय नेतेमंडळी भुजबळ फार्मवर येत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे, धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे, दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यानंतर आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी भुजबळांची भेट घेतल्याने भुजबळ फार्म हे राजकारणाचे मुख्य केंद्र बनले असल्याचे दिसून येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)