Nashik Diwali 2022 : नाशिककर! दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? सात मार्गांवर प्रवेश बंदी, असे आहेत पर्यायी मार्ग
Nashik Diwali 2022 : आजपासून दिवाळी (Diwali News) सणाला प्रारंभ झाला असून खरेदीसाठी गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिककर गर्दी करत आहेत.
Nashik Diwali 2022 : दिवाळीच्या (Diwali 2022) खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी शहरातील सात मार्गांमध्ये बदल केले आहेत तर दुसरीकडे रोजच कमी अधिक प्रमाणात होत असलेला पाऊस (Rains) आणि रस्त्यावरील खड्डे (Pothole) यामुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. याचा परिणाम म्हणजे, नाशिककरांनी (Nashik News) पर्यायी मार्गांचा वापर करून घर गाठावे लागणार आहे.
आजपासून दिवाळी (Diwali News) सणाला प्रारंभ झाला असून खरेदीसाठी गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिककर गर्दी करत आहेत. त्यातच पावसानं मध्यतंरी खोळंबा घातल्याने कालपासून उघडीप दिल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील सात मार्गांवर अवजड वाहनांसह चार चाकी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. शनिवार धनत्रयोदशीच्या दिवसांपासून सकाळी आठ ते रात्री अकरा पर्यंत प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद असल्याने पंचवटी भद्रकाली आणि पंचवटी मार्ग इतरत्र जाणाऱ्या वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.
पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेने वाहतूक मार्गातील बदलाची अधिसूचना जाहीर केली आहे. दिवाळी उत्सवासाठी किराणामालासह कपडे दागिने खरेदी करण्यासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा भागात गर्दी होत असते. दरम्यान वाहतूक कोंडी रोखणायसाठी नाशिक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. मालेगाव स्टॅन्ड वरून रविवार कारंजा कडे येणारी वाहने, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंट कडे येणारी वाहने, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेन रोडमार्गे धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट मेनरोड कडे जाणारी वाहने, रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी हे मार्ग पाहूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले होते.
तसेच पर्यायी मार्ग म्हणून नाशिक पोलिसांकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार पंचवटी व रविवार कारंजा कडून जिल्हाधिकारी कार्यालय अथवा शालिमार चौकाकडे जाण्यासाठी वाहन चालकांना मालेगाव स्टँडकडून मखमलाबादनाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका मार्गे इतरत्र जावे लागेल. जुने नाशिक मध्ये जाण्यासाठी गंजमाळ सिग्नल, दूध बाजार मार्गाचा वापर करता येईल. त्याचबरोबर नाशिक शहरातील मेनरोड, शालिमार बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गोदावरीच्या दोन्ही बाजूच्या घाटांवर, गाडगे महाराज पुलाखाली, सांगली बँक सिग्नल सागरमल मोदी विद्यालय, नेहरू गार्डन, कालिदास कला मंदिरा समोरील पेय अँड पार्क, नाशिक जिमखाना, जनावरांच्या दवाखान्या लगत, प्रसाद सर्कल , गंगापूर रोड, विद्या विकास सर्कल, प्रमोद महाजन उद्यान, डोंगरे विद्यालय वस्तीगृह, चोपडा लॉन्स जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर, शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावणार