एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : उमेदवारी आधीच भुजबळांना नाशिकमधून जोरदार विरोध, सकल मराठा समाजाकडून पोस्टरबाजी

Chhagan Bhujbal : उमेदवारीच्या आधीच छगन भुजबळ यांना मतदारसंघातून विरोध असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यातच नाशिक लोकसभेची उमेदवारी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मिळणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र यामुळे मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

गुरुवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची (Sakal Maratha Samaj) बैठक पार पडली होती. या बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले. छगन भुजबळांच्या विरोधात लोकसभेत मराठा उमेदवार द्या, मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. 

भुजबळांच्या चेहऱ्यावर काठ मारलेले पोस्टर व्हायरल 

आता उमेदवारी आधीच छगन भुजबळ यांना मतदारसंघातून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भुजबळ यांच्या चेहऱ्यावर काठ मारलेले पोस्टर सोशल मिडियावर (Social Media) टाकण्यात आले आहे. 

भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटला

तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील (Nashik Lok Sabha Constituency) अनेक गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग्ज देखील लावण्यात आले आहेत. भुजबळांची नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाचा विरोध वाढला आहे. भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचे दिसून येत आहे. आता छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) नाशिकमधून अधिकृत उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिकमध्ये मराठा समाज देणार उमेदवार

दरम्यान, एकीकडे छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाकडून नाशिकसाठी उमेदवाराची चाचपणी केली जात असून नाशकात झालेल्या बैठकीचा अहवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठवण्यात येणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?

Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Embed widget