Chhagan Bhujbal : 'सर्वोच्च न्यायालयाचं केवळ निरीक्षण, आदेश नाही'; छगन भुजबळांचे स्पष्टीकरण
Chhagan Bhujbal : शरद पवारांचे छायाचित्र व नाव आम्ही अलीकडे वापरत नाही. काही ठिकाणी चुकून राहिले आहे. यापुढे ते वापरणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे.
Chhagan Bhujbal येवला : शरद पवारांचे (Sharad Pawar) छायाचित्र व नाव आम्ही अलीकडे वापरत नाही काही ठिकाणी चुकून राहिले आहे. यापुढे ते वापरणार नाही. चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिले आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाला घड्याळ तर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) हे फक्त निरीक्षण आहे. आदेश नाही त्यामुळे काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणानंतर नोंदविली.
मंत्री भुजबळ येवला मतदार संघातील विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. निवडणूका म्हटले की, लोक इकडे-तिकडे जातात यात नवीन काही नाही. एकदा निवडणुका जाहीर झाल्या की सर्व चित्र स्पष्ट होईल ज्यांना जिकडे जायचे ते तिकडे जातील, अशा शब्दात आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेचा समाचार घेतला.
दिंडोरी जनता भारती पवारांनाच पसंती देणार
हरिश्चंद्र चव्हाण माजी खासदार आहे. दिंडोरीमधून महायु्तीकडून डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने साहजिकच ते उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेट घेतील त्यात गैर काही नाही. आघाडीकडून कम्युनिस्ट पक्षाचे जिवा पांडू गावितही चर्चेत आहे. त्याचेही प्रयत्न सुरु आहे. शरद पवार व राहुल गांधी यांच्या सभेचा दिंडोरी लोकसभा मतदार संघात काही फरक पडणार नाही. दिंडोरीत सर्वच ठिकाणी महायुतीचे आमदार आहे. त्यात भारती पवार सर्व गुण संपन्न उमेदवार आहे. जनता त्यांना पसंती देईल असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या जागेबाबत शिंदे गटाने दावा सोडला तर...
कांदा प्रश्नावरील नाराजीचा थोडा परिणाम होईल मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यात करून समतोल राखला आहे. कांद्यामुळे केंद्रातील सरकार पडले होते त्यामुळे कांद्याकडे अधिक लक्ष असते. मात्र सरकारने समतोल राखला आहे. फार फरक पडणार नाही.तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागेवर ठाम आहे. बाकी अफवा आहेत. लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्षाने आदेश दिल्यास लढू मात्र येवल्यातील लोक सोडतील का प्रश्न आहे. मात्र समीर भुजबळ यांनी नाशिकमध्ये खासदार म्हणून चांगले काम केले आहे. नाशिकच्या जागेबाबत आम्ही प्रयत्नही करतोय शिंदे गटाने जर दावा सोडला तर आम्ही महायु्तीकडून लढण्याची इच्छा भुजबळ यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा