Bogus crop insurance : नाशिकमध्ये बोगस पीक विमा उतरवल्याचं उघड, दोषींवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Bogus crop insurance : राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेतून अनेक ठिकाणी बोगस पिक विमा उतरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नाशिक : राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेतून अनेक ठिकाणी बोगस पिक विमा (Bogus crop insurance) उतरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातही चांदवड येथील दोन शेतकऱ्यांनी (Farmers) एन ए प्लॉटवर कांदा लागवड दाखवून पिक विमा उतरवला होता. बोगस पिक विमा संदर्भात एबीपी माझाने देखील बोगस पिक विमा संदर्भात चाचणी केली असता एन ए प्लॉटवर कांदा लागवड दाखवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर आता नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी या संदर्भात कृषी विभागाला अहवाल पाठवला आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या त्रुटी आढळल्या आहेत अशा ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची माहिती जलज शर्मा यांनी दिली आहे.
जलज शर्मा यांनी म्हटले आहे की, कृषी विभागाच्या माध्यमातून मिळालेले निर्देश प्राप्त झाले आणि त्यानंतर आम्ही जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात तपासणी केली. पिक विम्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. कृषी विभागाला तसा अहवाल देखील पाठवला आहे. एक रुपया पिक विमा योजनेत वेगवेगळे प्रकरणे समोर आली आहेत. एन ए प्लॉटवर देखील विमा उतरवला गेल्याच समोर आले आहे. कृषी विभागाला पाठवलेल्या अहवालातून मिळणाऱ्या निर्देशानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. कांदा लागवड आणि फळबागांची पीक विमा रक्कम जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी यापुढे दक्षता घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांना जे योगदान द्यावं लागायचं ते भरण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा भरता आला. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा झाला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांना बोगस वीक विमा उतरवल्याचे देखील समोर आले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 5 हजार 172 शेतकऱ्यांचा बोगस पिक विमा (Bogus crop insurance) असल्याची माहिती समोर आली होती. राज्य शासनाच्या एक रुपयात पिक विमा योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी (Farmers) कांदा पीक होत नसलेल्या ठिकाणी देखील कांदा (Onion) लागवड दाखवत खोटा विमा उतरवल्याचे समोर आले. यंदाच्या खरिपात 3 कोटी 96 लाखांचा बोगस पिकविमा उतरवल्याची माहिती कृषी विभागानं दिली. नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, देवळा, बागलाण, कळवण, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. यात 3670 कांदा उत्पादक तर 505 डाळिंब, द्राक्ष, सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा