![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशिक भाजपमध्ये नाराजीनाट्य, भारती पवारांवर आरोप करत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, त्याचवेळी पक्षाकडून हकालपट्टी
Nashik BJP : नाशिक भाजपमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
![नाशिक भाजपमध्ये नाराजीनाट्य, भारती पवारांवर आरोप करत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, त्याचवेळी पक्षाकडून हकालपट्टी BJP Yuva Morcha district president Yogesh Barde resigned accusing Dr Bharti Pawar Nashik Maharashtra Politics Marathi News नाशिक भाजपमध्ये नाराजीनाट्य, भारती पवारांवर आरोप करत युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, त्याचवेळी पक्षाकडून हकालपट्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/ab5a08702b7f94a656d7a41724416a261714196321115923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता नाशिक भाजपमधील (BJP Nashik) नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे (Yogesh Barde) यांनी भारती पवार विश्वासात घेत नसल्याचे कारण सांगून राजीनामा दिला आहे. तर पक्ष विरोधी कारवाया करत असल्याने जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव (Sunil Bachhav) यांनी योगेश बर्डे यांची हकालपट्टी केली आहे. यामुळे नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
योगेश बर्डे यांनी म्हटले आहे की, 2019 साली दिंडोरी लोकसभेत (Dindori Lok Sabha Constituency) डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या निवडणूक लढत असताना अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांना लोकसभेत पाठवले. डॉ. भारती पवारांना केंद्रात मंत्रीपद देखील दिले. त्यांना मंत्री पद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या कामकाजाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या फोल ठरल्या.
भारती पवारांनी कार्यकर्त्यांची बाजू ऐकली नाही - योगेश बर्डे
कुठलाही पदाधिकारी अडचणीत असताना त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की, त्यांच्याशी कधीच संपर्क होत नव्हता. आम्ही अनेकदा डॉ. भारती पवार यांना या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली नाही. त्यांच्या पीए बाबत देखील अनेक अडचणी होत्या. त्याही आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र भारती पवार यांनी नेहमी त्यांच्या पीएचीच बाजू धरली.
भारती पवारांवर योगेश बर्डेंचा आरोप
पाच दिवसांपूर्वी आमची दिंडोरी बैठक झाली. आम्ही त्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करायचे होते. त्यासाठी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव उपस्थित होते. आम्हाला त्यांनी प्रचाराच्या सुचना केल्या. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की, मागील पाच वर्षात आम्हाला जी काही वागणूक मिळाली त्याबाबत आम्हाला डॉ. भारती पवार यांच्याशी बोलायचे आहे. त्यानंतर भारती पवार यांनी मला फोन करून तुम्ही माझी बदनामी करताय, माझ्याशी तुला दुष्मनी घ्यायची आहे का? असे अतिशय उर्मठ भाषेत त्यांनी मला उत्तर दिले. मी गेल्या 15 वर्षांपासून भारतीय जनता पक्षात काम करत आहे. भारती पवारांकडून अशी जर गळचेपी होणार असेल तर मी काम करू इच्छित नाही. त्यामुळे मी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)