एक्स्प्लोर

Raj Thackeray : सरकारकडून तोडगा नाहीच, आता बिऱ्हाड आंदोलनकर्ते मुंबईत राज ठाकरेंच्या भेटीला; आंदोलकांना दिलासा मिळणार?

Raj Thackeray : बाह्यस्त्रोतांद्वारे करण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या बिऱ्हाड संघर्ष आंदोलनकर्ते राज ठाकरेंना भेटणार आहेत,

Raj Thackeray : आदिवासी आश्रमशाळेत काम करणाऱ्या तासिका शिक्षकांसह रोजंदारी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी करा, तसेच बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती रद्द करा, यासह विविध मागण्यांसाठी गत आठ दिवसांपासून आदिवासी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या बिऱ्हाड संघर्ष आंदोलनकर्त्यांनी आता राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या नेतृत्वाखाली 50 आंदोलनकत्यांचे शिष्टमंडळ आज गुरुवारी (दि. 17) मुंबईत राज ठाकरेंना भेटणार आहे. आंदोलनाची सविस्तर माहिती देत भरतीप्रक्रियेवर तोडगा निघावा, यासाठी त्यांच्याकडून हस्तक्षेपाची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा, यासाठी राज ठाकरे यांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर आंदोलकांना काय दिलासा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अनेक नेत्यांची आंदोलनाला भेट

दरम्यान, बुधवारी (दि. 16) माजी आमदार जे. पी. गावित आणि कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. जे. पी. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, काँग्रेस नेते लकी जाधव, राजू देसले यांच्यासह विविध नेत्यांनी देखील आंदोलकांची भेट घेतली आहे. मात्र, शासनाने पात्रताधारक उमेदवारांचीच कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल, असे स्पष्टपणे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांचा विरोध अधिक तीव्र होत चालला आहे. 

पोलीस बंदोबस्त कायम

आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून आदिवासी आयुक्तालयासमोर पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून, पोलीस कर्मचारी 12 तास तैनात आहेत. आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासकीय यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणावर तणावाचा सामना करावा लागत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akola Crime News: अकोल्यातील ड्रग्ज प्रकरणातला फरार आरोपी गब्बर जमादारचे कारनामे समोर; पोलिसांशी कनेक्शन, आमदारांसोबत फोटो, अनेक अवैध धंदे रासरोजपणे सुरू

Raj Thackeray-Uddhav Thackeray: आता 'राज'सोबत आहे..., उद्धव ठाकरेंचं विधान; सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च

महत्त्वाच्या बातम्या

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget