Raj Thackeray-Uddhav Thackeray: आता 'राज'सोबत आहे..., उद्धव ठाकरेंचं विधान; सामनाला दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा टीझर लॉन्च
Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का?, अशी चर्चा रंगली आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसताहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर आता मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) युतीचे वारे वाहात आहेत. तसेच उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून आले. परंतु राज ठाकरेंनी अद्यापतरी युतीबाबत सावध पवित्रा घेतल्याचा पाहायला मिळतंय. युतीबाबत सध्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असं राज ठाकरेंनी अनौपचारिक बोलताना सांगितले. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा टीझर समोर आला आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युती होणार का?, अशी चर्चा रंगली आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून वेगवेगळी उत्तरं मिळताना दिसताहेत. उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा टीझर काल प्रदर्शीत झाला असून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालंय. राज आता सोबत आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. तर युतीचं निवडणुका जाहीर झाल्यानंतर बघू अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी इतगपुरीतल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना दिली होती. त्यामुळे एकाला युती हवी आहे आणि दुसऱ्याला नकोय? अशी परिस्थिती निर्माण झालीय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची सडेतोड आणि बेधडक मुलाखत!⁰⁰
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 15, 2025
शनिवार १९ आणि रविवार २० जुलै रोजी सामना ऑनलाइनवर.@SaamanaOnline pic.twitter.com/1vJTGpg4Gt
मनसेचे बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आतापर्यंत आम्ही एकट्यानेच निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले होते. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. निवडणुकांचं वातावरण दिसत आहे. आमच्या बाजूने जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.























