Kalaram Mandir : महाआरती, दीपोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच काही...; राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात तीन दिवस आनंदोत्सव
Nashik News : अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्यापासून तीन दिवस आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Kalaram Mandir नाशिक : अयोध्येत प्रभू श्रीरामांची (Lord Shri Ram) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. येत्या 22 जानेवारीला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुपारी अडीचपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात उद्यापासून तीन दिवस आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात दि. 20 ते 22 जानेवारीदरम्यान आनंदोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या आनंदोत्सव कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काळाराम मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.
शनिवारी होणार हे कार्यक्रम
शनिवारी (दि. 20) सकाळी 7 वाजता सामूहिक ढोल प्रदक्षिणा होणार आहे. सकाळी 10 ते 11 पर्यंत दया कुलकर्णी या कीर्तन सादर करणार आहेत. सायंकाळी 4 ते 7 पर्यंत माहेश्वरी महिला मंडळाचे सुंदरकांड होणार आहे. रात्री 8 ते 10 पर्यंत नाशिकमधील गायक, नृत्य कलाकार श्रीराम गुणगान हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.
रविवारीही भरगच्च कार्यक्रम
रविवारी (दि. 21) सकाळी 7 वाजता वेदमूर्ती भालचंद्र शौचे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण होणार आहे. सकाळी 11 ते 11 पर्यंत दया कुलकर्णी यांचे कीर्तन होईल. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंगचे सारंग गोसावी व त्यांचे सहकारी 'स्वागत श्रीराम' भजनसंध्या सादर करतील.
सोमवारी महाआरती, दीपोत्सव
सोमवारी (दि.22) सकाळी 8.30 ते 11 पर्यंत दया कुलकर्णी यांचे कीर्तन होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत मनकामेश्वर मंडळाचे भक्त भजन होईल. तसेच दुपारी 12 वाजता महाआरती केली जाणार आहे. यांसह तर अयोध्या येथील थेट प्रसारण दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता संपूर्ण काळाराम मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अध्योध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य पूजेत
दरम्यान, नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अध्योध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य पूजेत सामील केला जाणार आहे, अशी माहिती नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी आणि महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या