नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट, महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक
Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात संघर्ष सुरू असताना आता महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केलीय. ते भाजपकडून इच्छुक आहेत.
![नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट, महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक Aniket Shastri willing to contest from Nashik Lok Sabha constituency from BJP Mahayuti Seat Sharing Maharashtra Politics Marathi News नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट, महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/f42a9bab4b5e686269aec3d866bdc48f1714199201901923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे महायुतीचे (Mahayuti Seat Sharing) त्रांगडे दोन दिवसांत सुटेल, अशी चर्चा असताना यात पुन्हा नवा ट्विस्ट आलाय. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन पक्षात संघर्ष सुरू असताना धर्म अभ्यासक, महर्षि पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
महंत अनिकेत शास्त्री हे दोन दिवसांत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महंत अनिकेत शास्त्री भाजपकडून (BJP) निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावरून आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली असल्याचा दावा अनिकेत शास्त्री यांनी एबीपी माझाशी बोलताना केलाय.
मोदी गॅरंटी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात - अनिकेत शास्त्री
एकीकडे हेमंत गोडसे देवाला साकडं घालत आहेत तर दुसरीकडे अनिकेत शास्त्री निवडणुकीची तयारी करत आहेत. नाशिक धार्मिकनगरी आहे. दर 12 वर्षांनी नाशिकला कुंभमेळा (Kumbh Mela) भरत असल्याने धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती संसदेत जावे या भावनेतून आणि मोदी गॅरंटी असल्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचा दावा त्यांनी केलाय.
अनिकेत शास्त्री यांच्या नावाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या
नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजय बोरस्ते (Ajay Boraste), माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या नावाची चर्चा असतानाच थेट भाजपकडून अनिकेत शास्त्री यांचे नाव समोर आल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे आता राज्याचं लक्ष लागले आहे.
शांतीगिरी महाराजांनी पहिल्याच दिवशी भरला नाशिकमधून उमेदवारी अर्ज
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. काल (दि. 26) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी शांतीगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर हेमंत गोडसे यांनी त्यांचा आणि त्यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांची उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे यांनीदेखील अर्ज घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)