एक्स्प्लोर

Nashik Sinnar Accident : सिन्नर अपघात: ना सूचना, ना बोर्ड, ना ब्लिंकर लाईट, डायव्हर्जनमुळे होत्याचं नव्हतं झालं! 

Nashik Sinnar Accident : सिन्नर शिर्डी महामार्गावर केलेले डायव्हर्जन दहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. 

Nashik Sinnar Accident : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली असून विनाकारण तसेच कुठलीही सूचना न देता रस्त्यावर केलेले डायव्हर्जन दहा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. 

मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात (Sinnar Shirdi Highway) झाला. सिन्नरजवळील पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 45 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तसेच उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील पाचव्या क्रमांकाच्या बसला हा भीषण अपघात (Major Accident) झाला. या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी वावी पोलिसांनी खाजगी आराम बसला धडक देणाऱ्या ट्रकचालकासह सदर रस्त्याचे काम करणाऱ्या मोन्टो कार्लो प्रा. लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधींविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या अपघातानंतर महत्वाची माहिती समोर आली असून विनाकारण तसेच कुठलीही सूचना न देता रस्त्यावर केलेले डायव्हर्जन करण्यात आले होते. वाहतूक वळवतांना सूचना दर्शक बोर्ड, स्पीड लिमीट बोर्ड, ब्लिंकर लाईट आणि ईतर सुविधा उपलब्ध न केल्याचाही ठेकेदार कंपनीवर आरोप ठेवण्यात आला आहे. सखोल तपास करत पोलीस उपनिरीक्षकानेच तक्रार दिली असून त्यानुसारच वावी पोलिसांनी खाजगी आराम बसला धडक देणाऱ्या ट्रकचालकासह सदर रस्त्याचे काम करणाऱ्या मोन्टो कार्लो प्रा. लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधींविरोधातही  गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसमधील दहा जणांचा मृत्यू झाला होता तर 26 प्रवासी जखमी झाले होते. 

अपघातानंतर बस चालक चालक हा फरार झाला होता. त्या सायंकाळी उशिरा वावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसरीकडे रस्त्याचे काम करणाऱ्या एजन्सी कार्लो या कंपनीच्या व्यवस्थापकाने व देखरेख करणाऱ्या प्रतिनिधी यांनी शिर्डी कडून येणारा रस्ता विनाकारण बंद करून दोन्ही बाजूचे वाहतूक सिन्नर कडून शिर्डीकडे जाणाऱ्या एकाच मार्गावर वळवून एखादा गंभीर अपघात होऊ शकतो.  जीवित हानी होऊ शकते याची जाणीव असून देखील रस्त्याचे डायव्हर्जन केले. त्याबाबत कोणत्याही प्रकारची सूचना बोर्ड किंवा स्पीड लिमिट बोर्ड, ब्लिंकर लाईट अथवा इतर सुविधा न करता वाहतूक एकाच मार्ग वळवली. त्यामुळेच हा अपघात झाल्याचा तपास वावी पोलिसांनी करत संबंधित मोन्टो कार्लो कंपनीसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अपघातांचे सत्र सुरूच

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरांसह जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यातच नाशिक-सिन्नर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या मार्गावरही दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात पुन्हा एका अपघाताची भर शुक्रवारी पडली. या मार्गावर असंख्य वाहनांची वर्दळ असते, मात्र नेहमीच काही ना काही कारणास्तव किंवा रस्त्याच्या काम असल्याचे  डायव्हर्जन दिले जाते, मात्र अशावेळी कुठलीही सूचना किनगाव फलक लावण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. अशातच शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget