एक्स्प्लोर

Nashik Police : नाशिकमध्ये गुन्हेगारीवर 'अंकुश' लावण्यासाठी 'कोम्बिंग ऑपरेशन', 58 टवाळखोरांवर कारवाई

Nashik Police : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरुच असल्याने पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

Nashik Police : नाशिक (Nashik) शहरात गेल्या काही दिवसांत खून तसेच गुन्हेगारीच्या (Crime) घटनांचे सत्र सुरू आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने शहरात शुक्रवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबविण्यात आले. त्यावेळी घरात आढळून आलेल्या 11 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात रोजच कुठे खून (Murder) तर कुठे प्राणघातक हल्ला, तर कुठे विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सराईत गुन्हेगारांसह इतर गुन्हेगारांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांमध्ये 'खाकी'चा जरब निर्माण व्हावा, याउद्देशाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Nashik CP) यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. या मोहिमेत एकूण 128  सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच हद्दपार करण्यात आलेल्या 51 संशयितांच्या घरी धडक दिली. त्यावेळी घरात आढळून आलेल्या 11 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.

नाशिक शहरातील मागील काही दिवसांपासून वाहन चोरी, घरफोडी, मोबाइल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगसह हाणामाऱ्या, शस्त्राचा धाक दाखवून जबरी लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी बैठक घेत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे ठरविले. त्यानुसार शुक्रवारी रात्री 11 ते मध्यरात्री तीन शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एकाचवेळी पोलिसांचा फौजफाटा वाहनांसह रस्त्यावर उतरला. संशयित गुन्हेगारांसह सराईत गुन्हेगारांची झाडाझडती पोलिसांनी सुरू केली. या मोहिमेत अनेक संशयितांच्या घरात घुसून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तीन पोलीस उपायुक्त, सर्व विभागांचे सहायक आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 29 सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, 236 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

64 सराईत गुन्हेगारांना धडा

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 128 रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी 64 संशयितांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तालय हद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या 51 इसमांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेतला गेला. यावेळी घरात आश्रय घेताना 11 संशयित हद्दपार व्यक्ती आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच एकूण 58 टवाळखोर इसमांवर महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून झडती

नाशिक पोलिसांकडून शहरातील आडगाव, म्हसरुळ, पंचवटी, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फुलेनगर, पंचवटी नाशिक, नीलगिरीबाग, नांदूरनाका, अश्वमेध नगर, शांती नगर, मखमलाबाद आदी परिसरात झाडाझडतीची मोहीम राबविली गेली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Embed widget