(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik BJP Mission : नाशिकमध्ये भाजपच मेगा प्लॅनिंग ठरलं, 'महाविजय 2024', फडणवीस-बावनकुळेंकडून घोषणा
Nashik BJP Mission : नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणीत महत्वाचा निर्णय झाला असून आगामी निवडणुकांसाठी मेगा प्लॅनिंग ठरलं आहे.
Nashik BJP Mission : नाशिकमध्ये (Nashik) भाजप कार्यकारिणीत महत्वाचा निर्णय झाला असून आगामी निवडणुकांसाठी मेगा प्लॅनिंग ठरलं आहे. भाजपने कार्यकारिणीच्या बैठकीत मिशन 200 चा नारा दिला असून शिवाय आगामी निवडणुकीसाठी 'महाविजय 2024' (Mission 2024) म्हणून संकल्प' करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची (BJP Meet) बैठक संपन्न झाली असून दोन दिवसांच्या विचारमंथनानंतर भाजपकडून लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200 चा नारा दिला आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधान सभेसाठी मिशन 200 चे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवणार असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर आमदार श्रीकांत भारतीय (Shreekant Bhartiy) यांची प्रदेश संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक इन्चार्ज म्हणून ते काम पाहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
सद्यस्थितीत पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक व राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून भाजपचं मंथन सुरू होत. मागील काळात काय रणनीती असावी, यावर खलबत सुरू आहे. आज झालेल्या बैठकीत भाजपकडून राज्यात मिशन 200 चा नारा देण्यात आला आहे. लोकसभा साठी मिशन 45 तर विधानसभा निवडणुकीसाठी मिशन 200 अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी आगामी निवडणुकांच्या रणनीती संदर्भात विचारमंथन करण्यात आले.
भाजपकडून महाविजय 2024 चा महासंकल्प
यावेळी पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून भाजपने पुन्हा मिशन 24 घोषणा केली आहे. राज्यातून 48 खासदार निवडून जातात सध्या भाजपकडे 23 खासदार आहेत भाजपला केंद्रात पुन्हा 47 यायचे असल्यास महाराष्ट्रातून किमान 40 जागांचे बळ भाजपला हवे आहे त्यामुळे केंद्रातून सत्तेचे स्वप्न पाहायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदारांनी खासदारांची कुमक भाजपला हवी आहे त्यामुळे या बैठकीत मिशन 45 अशी घोषणा करण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुका देखील आगामी काळात होणार असल्याने या निवडणुकांसाठी भाजपकडून मिशन 200 चा नारा देण्यात आला आहे