एक्स्प्लोर

Ajit Pawar : झिरवाळ साहेब कुठेय? कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर अजितदादांचा मिश्कील टोला, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar on Narhari Zirwal : दिंडोरीत अजित पवारांचे स्वागत होत असताना कार्यकर्त्यांनी झिरवाळ साहेब कुठे आहेत? असा प्रश्न विचारला. यावेळी अजित पवारांनी मिश्कील टोला लगावला आहे.

नाशिक : उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) जनसन्मान यात्रेला (Jansanman Yatra) दिंडोरीतून सुरुवात झाली. काल अजित पवारांच्या उपस्थितीत दिंडोरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अजितदादांसह राष्ट्रवादीचे अनेक मंत्री दिंडोरीत दाखल झाले होते. मात्र दिंडोरीत खरी चर्चा रंगली ती अजित पवार गटाचे नेते, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांची. अजित पवारांना दिंडोरीत काही कार्यकर्त्यांकडून नरहरी झिरवाळ साहेब कुठेय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अजित पवारांनी मिश्कील टोला लगावला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून झिरवाळ कुटुंबीय अजित पवारांना सोडून शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाणार, असा चर्चा सुरु आहेत. गोकुळ झिरवाळ यांनी माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील. संधी मिळाली तर वडिलांविरोधात निवडणुकीला सामोरे जाईल, असे वक्तव्य केले आहे. चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेकडेही पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर नरहरी झिरवाळ यांनी मी अजित पवार यांच्या सोबतच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे झिरवाळ कुटुंबियांची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

अजित पवारांचा मिश्कील टोला

गुरुवारी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून जनसन्मान यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी दिंडोरीत अजित पवारांचे स्वागत होत असताना कार्यकर्ते झिरवाळ साहेब कुठे आहेत? असा प्रश्न करत नरहरी झिरवाळ यांचा शोध घेत होते. त्यावेळी अजित पवार यांनी नरहरी झिरवाळ यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. नरहरी झिरवाळ कुणाच्या गाडीत कोणाला माहित? असा मिश्कील टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यानंतर मी दुसऱ्या गाडीत होतो, ते दुसरीकडे होते, असे सांगत केली अजित पवारांनी सारवासारव केल्याचे दिसून आले. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्यामुळे अजित पवारांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

दिंडोरीत नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ? 

दरम्यान, गोकुळ झिरवाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना मी शरद पवार यांच्या सोबत असून आगामी निवडणुक लढण्याचे देखील त्यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ विरुद्ध गोकुळ झिरवाळ अशी लढत पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : 'पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं'; नरहरी झिरवाळांची अजितदादांसमोर तुफान फटकेबाजी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवलीABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in India

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Embed widget