Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

Manikrao Kokate : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1995 ते 1997 च्या काळातील हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे (Sunil Kokate) यांनी शासनाकडून सदनिका घेतल्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. त्याचा तपास सुरू होता, त्या प्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर
1995 ते 97 च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी आमचं उत्पन्न हे कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा होता आरोप. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे.
यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावली. माणिकराव कोकाटे यांंच्यावरती कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
माणिकराव कोकाटेंचं आमदारकी अन् मंत्रीपद धोक्यात?
न्यायालयाने राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर संकट ओढावलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

