एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nandurbar : अपघातग्रस्त कुटुंबासाठी नंदुरबार पोलिस ठरले देवदूत

Nandurbar : नंदुरबार पोलीसांनी अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन 'माणुसकीचा दसरा' साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

नंदुरबार: मागील आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणाऱ्या आयशरला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार महिला व दोन पुरुष अशा सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 15 मजूर गंभीर जखमी झाले. पोलीसांनी बस चालकाला तात्काळ अटकसुद्धा केली. परंतु गोष्ट इथे संपत नाही.

सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरु झाला आहे. दसऱ्याच्या तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर बाया माणसे..मुले ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात. चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे. दसरा, दिवाळी, मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढीपाडव्याला गावाला परतायचे. पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट.

Nandurbar :  अपघातग्रस्त कुटुंबासाठी नंदुरबार पोलिस ठरले देवदूत

 या भीषण अपघातात कर्ते पुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेडा या गावावर शोककळा पसरली. नंदुरबारचे जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह गावात येतात. अपघातात कुणी आई तर कुणी बाप गमावलेला असतो. डझनभर लोक कायमचे जायबंदी झालेले. त्यांच्या मजुरीवर अवलंबून असलेली अनाथ झालेली उघडी वाघडी लहान मुले तर  गांगरून गेलेली. झोपडीतले दारिद्र्य, दुःख, दैना पाहून सारेच हेलावून जातात. या आदिवासी लोकांची भाषा कोणाला समजत नाही. समजते ते फक्त त्यांच्या डोळ्यातले दुःख. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर पोलीस अधिक्षकांचे फर्मान सुटते. 

Nandurbar :  अपघातग्रस्त कुटुंबासाठी नंदुरबार पोलिस ठरले देवदूत

शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भापकर हे अपघात मृत्युमुखी पडलेल्या कुंटुबाच्या घरात दोन महिन्याचा किराणा पाठवतात. पुन्हा फर्मान सुटते या साऱ्या मयत व जखमी लोकांच्या घरी FIR ची प्रत, PM रिपोर्ट, मृत्यू दाखला,पंचनामा आदी कागदपत्रांची फाईल घरपोच होते. सरकारी मदत आणि विमा रक्कम मिळण्यासाठी जलद हालचाल सुरु होते. उचल म्हणून घेतलेले पैसे ठेकेदारांने परत घेऊ नये यासाठी त्याला सूचना दिली. बसमालकाने देखील या लोकांना आर्थिक मदत केली. अपघातग्रस्तांचे दुःख हलके केल्यांने एरव्ही कडक वाटणारे पोलिस आदिवासी पाड्यावरचे देवदूत अशी ओळख निर्माण झाली. 
 
नंदुरबार पोलीसांनी मात्र अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन 'माणुसकीचा दसरा' साजरा केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. आदिवासींनीही  पोलीसांचे आभार मानले आहेत. दोघांनाही एकमेकांची भाषा समजली नसली तरी परस्परांच्या भावना मात्र नक्कीच कळाल्या असतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझाChandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्प

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
Embed widget