एक्स्प्लोर

Nandurbar News : नंदुरबार बाजार समिती दोन दिवस बंद, शेतीमालाची आवक वाढल्याने निर्णय

Nandurbar News : नंदुरबार बाजार समितीत (Nandurbar Market committee) दोन दिवस खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत.

Nandurbar News : नंदुरबार बाजार समिती (Nandurbar Market committee) दोन दिवस बंद राहणार आहे. कारण बाजार समितीत शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माल ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नसल्याने आणि जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा  (Unseasonal rain) जोर कायम राहण्याचा अंदाज असल्यामुळे खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. अवकाळी पावसामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचं नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेत बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.

नंदुरबार बाजार समितीत कडधान्याची आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शेतीमालाची आवक वाढल्यामुळे माल ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नाही. तसेच काल (15 मार्च) झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत आणलेला शेतकऱ्यांचा शेतीमाल भिजल्याने नुकसान झालं आहे. अशातच जिल्ह्यात येत्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पाऊस बरसत आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Unseasonal rain : बुलढाण्यासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Encounter: '...हा खूनच आहे', वकील नितीन सातपुतेंचा आरोप, Rohit Arya एन्काऊंटर बनावट?
Workplace Harassment: 'माझ्या शरीरावर हात लावणं', Solapur मधील Kist Finance च्या महिला कर्मचाऱ्याचा गंभीर आरोप
AI Education: 'तिसरीपासून मुलांना AI शिकवणार', शालेय शिक्षण सचिव Sanjay Kumar यांची घोषणा
Farmer Loan Waiver: 'सरकार मुघलांपेक्षा भयंकर', Bacchu Kadu यांच्या भूमिकेवर Jarange पाटील कडाडले
Arms Racket: महाराष्ट्र केसरी Sikander Shaikh ला पंजाबमध्ये अटक, Papla Gurjar टोळीशी संबंधाचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
लांडगा आला रे आला... पंचायत समिती आवारात 5 जणांवर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुल टल्ली; राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना
Australia vs India, 2nd T20I: मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
मिस्टर गंभीर भारतीय क्रिकेटमधील नवा ग्रेग चॅपेल, वाट लावून टाकणार! हर्षित राणामुळे 'गुरुजी' विरोधात भडका; नेमकं घडलं तरी काय?
Embed widget