एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Unseasonal rain : बुलढाण्यासह परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची तारांबळ; रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह परभणीत (Parbhani) जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department)  दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह परभणीत (Parbhani) जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे.

परभणीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, ज्वारीसह गव्हाला फटका बसण्याची शक्यता 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज परभणी शहरासह परिसरात जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे. परभणीत आज पहाटे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पहाटे चार वाजल्यापासून परभणीत जोरदार वारे सुटले होते. त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. या वाऱ्यामुळे आणि या पावसामुळे काढणीला आलेला गहू, काढलेला हरभरा, ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अकोला जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झआला आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे जिल्ह्यात कालपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

तर मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणा पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उकाड्याने हैराणा झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.

18 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत; आजही पावसाचा अंदाज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्तीTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 02 Dec 2024 : 5 PmSub District Election Officer On EVM : मतं पडताळणीची नेमकी प्रक्रिया काय? कोण करु शकतो अर्ज?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget