एक्स्प्लोर

Nandurbar News:  नंदुरबारमध्ये पहाटे बिबट्याचा थरार! घरातून 50 मीटर दूर फरफटत नेले, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Leopard attack: पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने महिला घरात झोपली असल्याचा अंदाज घेऊन पुढील कुडाचा दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. महिलेला घरातून बाहेर फडफटत नेले.

Nandurbar News:  नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात रात्री कुडाच्या झोपडीत झोपलेल्या महिलेला पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरातून ओढत नेत महिलेचे धड शिरापासून वेगळे करत तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना आता वारंवार समोर येताना दिसून येत असून वनविभागाने यावर उपायोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील नयामाळ येथे सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बिबट्याने घरात घुसून महिलेवर केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचे शिरापासून धड वेगळे झाले असून बिबट्याने महिलेला घरातून सुमारे 50 मीटर ओढत नेले असल्याची घटना घडली आहे. 33 वर्षीय सरिता ऊर्फ सरिला वन्या वसावे असे मयत महिलेचे नाव आहे. 

ही 33 वर्षीय आपल्या नयामाळ येथील कुडाच्या झोपडीत रात्री झोपली होती. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने महिला घरात झोपली असल्याचा अंदाज घेऊन पुढील कुडाचा दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. महिलेला घरातून बाहेर फडफटत नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र, रात्रीच्या किर्र अंधारात घरात काय झाले, याचा कोणालाच अंदाज आला नाही. घडलेला प्रकार लक्षात येईपर्यंत बिबट्याने महिलेला फरफटत नेले होते.

दरम्यान सकाळच्या सुमारास सरिता यांचा मृतदेह घरापासून पूर्वेस सुमारे 50 ते 60 मीटर अंतरावर एका शेताच्या परिसरामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात सरिता यांचे डोके धडापासून वेगळे झाले असून डोक्याचा, उजव्या कानाचा भाग पूर्णपणे बिबट्याने नष्ट केला आहे. तर सरिता यांचे शरीरापासून डोके 30 मीटर अंतरावर आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्यासह पोलिस नाईक अनिल पाडवी, तुकाराम पावरा यांचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी नरशा होण्या वसावे यांच्या खबरीवरून तळोदा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक केदार अधिक तपास करीत आहेत.

बिबट्याची परिसरात दहशत

दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा या तालुक्यात अति दुर्गम भागात बिबट्याच्या वावर असल्याच्या आणि बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या घटना नेहमीच समोर येत असतात. दुर्गम भागात बिबट्याचे हल्ले जनावर आणि माणसांवर होत असून दुर्दैवी पणे त्यांचा मृत्यू होत असतो. यामुळे स्थानिकांमध्ये दहशततीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वनविभागाने जिल्हा प्रशासनाने अधिकचे लक्ष घालणे, लवकरच यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोललेले जात आहे.

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget