Nanded Rap Song : कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप बनवला, पोलिसांनी 'खाकी' दाखवताच मागीतीली माफी
Nanded Rap Song : शाळेत असतांना हातात हाथकड्या अश्या आशयांचा रॅप साँग तयार करुन समाज माध्यमावर टाकला होता.
Nanded Rap Song : कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणे नांदेडच्या दोघांना महागात पडले आहे. कारण, नांदेड (Nanded) पोलीसानी या दोघांना ताब्यात घेऊन चांगलीच समज दिली आहे. पोलिसांनी समज दिल्यावर या रॅपरनी माफीचा व्हिडियो काढून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. कैद्यांचे कपडे घालून या दोघांनी नांदेड शहर हा गँगस्टरचा अड्डा असल्याचं म्हणत व्हिडिओ तयार केला होता. तर, शाळेत हातात हाथकड्या अश्या आशयांचा रॅप साँग तयार करुन समाज माध्यमावर टाकला होता. पण याच रॅप साँगवरुन त्यांनी केलेली भाईगीरी त्यांना चांगलीच महागात पडली आहे.
सोशल मिडियावर रील्स बनवणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. मात्र, अनेकजण चिथावणीखोर भाषेचा वापर करून गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ तयार करत असल्याचे देखील समोर येत आहे. दरम्यान, नांदेड शहरात देखील असेच काही तरुण स्वतःला भाई म्हणत व्हिडिओ तयार करताना पाहायला मिळत आहे. तर नांदेड शहारतील दोन रॅपरनी असाच एक व्हिडिओ बनवला होता. कैद्यांचे कपडे घालून या दोघांनी भाईगीरीवर रॅप साँग तयार केला होता. "स्कूलमें ही सिखी है मैने हाथोमें हाथकडीयाँ...” अशा आशयाचे हे व्हिडिओ होते. तर याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी खाकीच्या भाषेत त्यांना समज दिली. पोलिसांची 'येथेच्छ' समज मिळाल्यावर लगेचच या दोन्ही रॅपरनी नवीन व्हिडिओ बनवत माफी मागितली आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीच्या व्हिडिओची क्रेझ
अल्पवयीन मुलांमध्ये व्हिडिओ तयार करुन ते युट्यूबवर व्हायरल करण्याची 'क्रेझ' पाहायला मिळत आहे. तर अनेकजण साउथमधील चित्रपट पाहून त्या पद्धतीने भाईगिरी करणारे व्हिडिओ देखील तयार करत आहे. अशा व्हिडिओला अधिक रिच मिळत असल्याने हातात देशीकट्टा, पिस्टल बाळगणारे व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे सध्या सोशल मिडीयावर स्वतःला दादा, भाई, डॉन म्हणवून घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण याच मोहात शाळकरी अल्पवयीन मुलं देखील अडकत आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कंधार तालुक्यातील कौठा येथील एका दहावीतल्या विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे मुलांमधील व्हिडिओ बनवण्याचा क्रेझ त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. अशा सर्व परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज बनली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: