Nanded News : माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला 'जीआय टॅग'
Nanded News : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. या तांबुलला आता जीआय टॅग मिळाला आहे.
![Nanded News : माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला 'जीआय टॅग' Nanded News GI Tag for Mahurs Renuka Devi Temple Tambul Nanded News : माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला 'जीआय टॅग'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/14/28ed483c6bdbf49cab45708d28fd1334168673787337983_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded News : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात (Renuka Devi Temple) विडा तांबुलचे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी एक मानला जातो. देशभरातून माहूर (Mahur) येथे येणारे भाविक तांबुलचा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या तांबुलला आता जीआय टॅग (GI Tag) मिळाला असून ती माहूरची ओळख निर्माण करणार आहे.
पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात. ज्याणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. रक्तशुद्धीकरणासाठी नागवेलीपान आणि काथ हे खूपच उपयुक्त आहे. खोकल्याकरता लवंग, जेष्ठमध पचनक्रिया चांगली होण्यासाठी, बडीशेप सदैव ऊर्जित आणि सचेत ठेवण्याकरता, केशर आणि जायफळ हे वेदनाशामक कार्य करत असल्याचे आयुर्वेदामध्ये आढळते
विड्याची पाने येतात विडूळ, तेलंगणातून
विड्यासाठी लागणारी साहित्याची पानांचा यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडूळमधून तसेच तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातून आणि स्थानिक गुंडवळ व लांजी येथून मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येतात.
तांबुलचे महत्त्व पुराणकाळापासून आहे. संत विष्णुदास यांच्या केशर कस्तुरी मिश्रित तांबुल लाल रंगला वदनात असा, विडा घ्या हो अंबाबाई माझी अनाथाची आई अशा अनेक अभंगांमध्ये त्याचा उल्लेख आहे.
काय आहे जीआय टॅग?
वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइजेशननुसार, जीआय टॅग एकप्रकारचा लेबल आहे. जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रुपात दिला जातो. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो. त्याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते.
नैवेद्यानंतर तांबुलचा नैवेद्य
रेणुकादेवी मंदिरात तांबुलची परंपरा आहे. देवीला पुरणपोळीचा मुख्य नैवेद्य अर्पण केल्यानंतर तांबुलचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. देशभरातून ये-जा करणारे अनेक भाविक वर्षभर पुरेल एवढा ओला तांबुल खरेदी करून प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात व दररोज जेवणानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतात.
माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर यादवकालीन
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने श्री रेणुका देवीचे मंदिर बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिर लहान असून प्रवेश दरवाजा दक्षिण मुखी आहे. तर श्री रेणुका मातेला परशुरामाची माता म्हणून ओळखले जाते. माहूर गडावरील श्री रेणुका मातेचा मुखवटा हा पाच फुटांचा असून तांबड्या केशरी रंगाची भव्य मूर्ती गळ्यापासून वरती आहे. शेंदूर माखल्याने मातेचे तेज डोळ्यातही मावत नाही. या मूर्तीच्या भोवती सतत नंदादीप तेवत असतो. तर मातेला दररोज पुरणाचा नैवेद्य असतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)