एक्स्प्लोर

Nanded News : कर्ज काढून लेकीचं लग्न लावलं, पण 12 दिवसात नववधूचा दुर्दैवी शेवट, विष पाजलं अन् 1 लाखासाठी जीव घेतल्याचा आरोप, नांदेड हादरलं

Nanded Crime News : लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तिचा असा दुर्दैवी अतं झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर तिच्या माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केले आहेत.

नांदेड :  पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली, त्यानंतर हुडांबळी आणि पैशांसाठी मानसिक आणि शारिरीक छळाच्या अनेक घटना समोर आल्या, एकिकडे अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागणी होत असतानाच आता नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेल्याचं समोर आलं आहे. ताऊबाई चव्हाण असं या नवविवाहीतेचं नाव आहे. या नवविवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तिचा असा दुर्दैवी अतं झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर तिच्या माहेरच्या लोकांनी गंभीर आरोप केले आहेत.

...म्हणून विवाहितेला संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाई हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोड याच्यासोबत झाला होता. लग्नात हुंडा म्हणून ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्यामुळे सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केल्याचा, आरोप आहे. ताऊबाईच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी 6 लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार त्यांनी 5 लाख रुपये दिले होते. मात्र, उर्वरित 1 लाख रुपयांसाठी नवविवाहीत ताऊबाईला विष पाजलं. 9 जुलै रोजी ताऊबाईला अचानकपणे उलट्या होऊ लागल्या. तिला आधी मुखेडमध्ये रूग्णालयात नेलं आणि नंतर हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. परंतु,13 जुलै रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

1 लाख कमी दिल्यानं लेकीला मारलं, कुटुंबियांचा आरोप

नवविवाहित मृत ताऊबाईच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हुंड्यासाठीच तिला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती, सासू आणि सासरे या तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं की, विवाहितेला विष पाजन्यात आलं आहे की तिने स्वतः विष प्राशन केलं याचा तपास सुरु आहे.

आपल्या लाडक्या लेकीसाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, हुंड्यात मागितलेल्या पैशांमध्ये केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन लेकीचा विवाह चांगला थाटामाटत लावून दिला होता. मात्र एक लाखासाठी सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचं ताऊबाईच्या नातेवाईकांनी सांगितलं. या घटनेनं पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे, तर नव्या नवरीचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Accident News: काळजी पिळवटून टाकणारी दुर्घटना; खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू
काळजी पिळवटून टाकणारी दुर्घटना; खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं, खेळताना बुडून चार लहानग्यांचा मृत्यू
Shivsena Nanded news: शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...'
शिवसैनिकांनी 'त्या' आमदाराविरोधात खदखद बोलून दाखवली, श्रीकांत शिंदे सर्वांदेखत म्हणाले, 'हा पक्ष एकनाथ शिंदे चालवतयात...'
धक्कादायक! नांदेडमध्ये पोलिसांचं कॉम्बिग ऑपेरेशन, तब्बल 43 तलवारी पकडल्या, एकाला अटक 
धक्कादायक! नांदेडमध्ये पोलिसांचं कॉम्बिग ऑपेरेशन, तब्बल 43 तलवारी पकडल्या, एकाला अटक 
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget