एक्स्प्लोर

Manoj Jarange : मराठ्यांनो मुंबईला जाण्यासाठी तयार रहा, अखेर मनोज जरांगे बोललेच; सरकारची अडचण वाढणार

Maratha Reservation :  24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास आपण मराठा समाज बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे म्हणाले होते.

नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच,  24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास आपण मराठा समाज बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. त्यामुळे मुदत संपण्यासाठी आता फक्त 15 दिवसांचा कालवधी राहिला आहे. मात्र, सरकारकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने मराठ्यांनो मुंबईला (Mumbai) जाण्यासाठी तयार रहा असे थेट आवाहनच जरांगे यांनी नांदेडच्या (Nanded) नायगाव येथील सभेतून केले आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

मनोज जरांगे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांची नायगाव सभा पार पडली. विशेष म्हणजे मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाने तयार राहावे असे जरांगे पहिल्यांदाच बोलले आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "आता मराठ्यांनी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे. माझा जीव गेला तरी चालेल. मी माझ्या आई-वडीलांना सांगितले आहे की, मी मेलो तर तीन मुलांवर समाधान मानावं. बायकोला कपाळ पुसून बस असं सांगितले आहे. माझ्या जीवाची बाजी लावणार, पण एक पाऊल सुद्धा मागे हटणार नाही, असे सांगून घराच्या बाहेर पडलो आहे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते घेतल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असे जरांगे म्हणाले. 

भुजबळ यांच्यावर निशाणा...

याचवेळी जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला. "आरक्षण तर भेटु दे, मग तुला दाखवतो. हिशोब करू असे जरांगे म्हणाले. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरही टीका केली. मराठा समाजाच्या 35 लाख नोंदी सापडल्या असून, 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणणाऱ्यांनी हे पाहिले आहे. आता सर्वांना जातीचे प्रमाणपत्र मिळत आहे. तसेच, आपल्याला सरसकट आरक्षण हवे आहेत, ते मिळेपर्यंत आपण गप्प बसणार नसल्याचे जरांगे म्हणाले. 

पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही...

मराठवाड्यात नोंदी आहे. पण, अभ्यास्क नसल्यामुळे नोंदी असून अधिकारी जातीवाद निर्माण करायला लागले आहे. याबाबत सरकार निर्णय घेत नसेल तर त्यांना परिणाम भोगावे लागेल. लेकरांचे भविष्य महत्वाचे आहे, पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही. मराठा काय चीज आहे हे लक्षात येईल. मराठा आरक्षणवर बारकाईने लक्ष आहे. सरकार, मंत्री, आमदार हे भूमिका मांडत आहे. त्यावर लक्ष बारीक लक्ष आहे. मराठा आणि महाराष्ट्र काय आहे 24 डिसेंबरनंतर कळेल, असेही जरांगे म्हणाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'सौ सुनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले...

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget