Nanded: हजारो विद्यार्थी ररस्त्यावर; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने प्रशासनाची उडाली धावपळ
student protest: हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Nanded News: विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या मागणीसाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर एकत्र येत आंदोलन केले. एवढ्या मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी जमा झाल्याने काही वेळेसाठी मोठा गोंधळ उडाला होता. तर या आंदोलनामुळे प्रशासनाची सुद्धा धावपळ उडाल्याची पाहायला मिळाले.
यावेळी आंदोलकांनी आरोप करताना म्हटले आहे की, कोरोना काळात महाविद्यालये बंद होती. त्यामुळे शैक्षणिक वर्ग ऑनलाइन पद्धतीने चालू होते. दरम्यान फार्मसी, एमबीए, लॉ, एमएससी यासह विद्यापीठात विविध शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग फक्त दोन महिने घेण्यात आले आहेत. या दोन महिन्याच्या ऑफलाईन अभ्यासक्रमानंतर लगेच उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. त्यामुळे या ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी विरोध केला असून MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
परीक्षा MCQ पद्धतीने पद्धतीने घ्या...
विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग फक्त दोन महिने घेण्यात आले असल्याने त्यांचा अभ्यास झाला नाही. मग त्यांनी परीक्षा कशा द्यायच्या असा प्रश्न आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे उन्हाळी सत्र परीक्षा जळगाव, अमरावती, विद्यापीठाप्रमाणे ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी यावेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
एकाचवेळी हजारो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनाची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला होता. तर यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
दोन महिन्यात कसा अभ्यास होणार...
आधीच कोरोना काळात मुलांचा अभ्यास झाला नाही. त्यात विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग फक्त दोन महिने घेण्यात आले आहे. अशावेळी फक्त दोन महिन्याच्या अभ्यासक्रमावरून आम्ही कशी ऑफलाईन परीक्षा द्यावी असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पेपर एकसमान झाले पाहिजे आणि MCQ पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. तसेच सोलापूर विद्यापीठ एका दिवसात आपले निर्णय बदलू शकतात तर या विद्यापीठाचे कुलगुरू का आपला निर्णय बदलू शकत नाही असेही यावेळी विद्यार्थी म्हणाले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI